Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

कला केंद्रातील अंतर्गत वाद – गर्भवती नर्तिकेचा खुन, पेट्रोल टाकून जंगलात जाळले, कळंबचे 4 अटक, 2 फरार

समय सारथी by समय सारथी
September 28, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
95
VIEWS

धाराशिव – समय सारथी

कलाकेंद्रातील अंतर्गत वादातुन मारहाण करून एका गर्भवती नर्तिकेचा खुन केल्याची घटना घडली असुन तिचा मृतदेह 275 किलो मीटर दुर जंगलात नेहून पेट्रोल टाकून जाळण्यात आला. या प्रकरणी कळंब येथील 4 जणांना अटक केली असुन धुळे पोलिस व धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. अतिशय अमानवीय अश्या या गुन्ह्याची 3 दिवसात उकल करून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. ही नर्तिका यापुर्वी धाराशिव येथील एका कला केंद्रावर होती, अशी माहिती आहे. मयत व आरोपी हे कळंबचे असल्याने त्या अनुषंगाने तपास सुरु आहे.

मयत नर्तिका 31 वर्षीय पिंकी हनुमंत काटकर ही रायगड जिल्ह्यातील असुन ती अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड येथील सप्तसुर या कला केंद्रावर होती, 2 आरोपी फरार असुन पोलिस याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या आरोपीत 2 महिला व 2 पुरुष आहेत. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार,सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, जावेद काझी, प्रकाश औताडे, पोह फरहान पठाण,चापोह नागनाथ गुरव यांनी ही कारवाई केली, यात स्थानिक गुन्हे शाखेची भुमिका महत्वाची ठरली.

धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ परिसरातील गरताडबारी घाटाजवळ निर्जन ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळल्यानंतर पोलिसांनी महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज, वाहनाची माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत सहा संशयित आरोपी निष्पन्न केले. त्यापैकी चौघांना अटक करण्यात आली असून दोघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, 22 सप्टेंबर रोजी नरव्हाळ, ता. जि. धुळे येथील चाळीसगाव-धुळे महामार्गाच्या पश्चिमेला मुरमाड टेकड्यांलगत वनक्षेत्रातील निर्जन ठिकाणी अनोळखी महिला गंभीररित्या भाजलेल्या अवस्थेत आढळली. वैद्यकीय अहवालानुसार ती गर्भवती असल्याचा व जळल्याने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल आला. या प्रकरणी मोहाडीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक  322/26, भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे तसेच स्थानिक गुन्हे शाखा व मोहाडीनगर पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक व फिंगरप्रिंट तज्ज्ञांच्या मदतीने घटनास्थळावरून परिस्थितीजन्य पुरावे संकलित करण्यात आले.

तब्ब्ल 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे आणि मोहाडीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी महामार्गावरील सुमारे 11 तासांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यातून संशयित वाहनाची माहिती मिळाली. वाहनाचे तांत्रिक विश्लेषण केल्यानंतर पोलिसांचे पथक जामखेड, जि. अहिल्यानगर येथील सप्तसूर सांस्कृतिक कला केंद्रापर्यंत पोहोचले. तेथून पोलिसांनी कळंब येथील सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन (38) आरिफ ऊर्फ खुज्या आसिफ शेख (31) व लक्ष्मी बालाजी पवार (30) या 3 जणांना तर जामखेड येथील नर्तिका स्वाती ऊर्फ आरती गणेश कुऱ्हाडे (28) हिला अटक केली. कळंब येथील फारुख शेख आणि छत्रपती संभाजीनगर येथील रोहिणी जाधव हे 2 जण फरार आहेत.

कलाकेंद्रातील वादातून मारहाण

महिलेचा कलाकेंद्रातील अंतर्गत वादातून आरोपींसोबत वाद झाला. त्यानंतर तिला बीड येथील मांजरसुंबा चौफुलीजवळील एका घरात मारहाण करण्यात आली. त्यात ती बेशुद्ध झाली. ती मृत झाल्याचे आरोपींना वाटल्याने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तिला वाहनातून राजस्थानच्या दिशेने घेऊन जाण्याचे ठरवले. मात्र, सुमारे 275 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर धुळे जिल्ह्यातील गरताडबारी घाट परिसरातील निर्जन वनक्षेत्रात तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले. त्यानंतर आरोपी मालेगाव-मनमाड मार्गे जामखेडच्या दिशेने निघून गेले.

अटक केलेल्या आरोपींपैकी सर्फराज ऊर्फ शफीक अलीम मोमीन याच्याविरुद्ध धाराशिव व बीड जिल्ह्यात विविध कलमान्वये गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडीनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, नितीन करंडे, अशोक पायमोडे तसेच पोलीस अंमलदारांनी केली.

Previous Post

वडील आर्थिक संकटात, फाशी घेतील म्हणुन पाठ सोडेना – मुलाला धास्ती, कुटुंबाची व्यथा

Related Posts

महाराष्ट्र

वडील आर्थिक संकटात, फाशी घेतील म्हणुन पाठ सोडेना – मुलाला धास्ती, कुटुंबाची व्यथा

September 26, 2026
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना एकरकमी मदत द्या, काय मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे – आदित्य ठाकरे

September 26, 2026
महाराष्ट्र

दुष्काळाच्या झळांना आता शासनाच्या सवलतींचा आधार

September 26, 2026
महाराष्ट्र

आमने सामने चर्चेला तयार – वेळ ठिकाण सांगा, दानवेंनी स्वीकारले आव्हान, आमदार राणानी पाण्यावरुन फसविले

September 26, 2026
महाराष्ट्र

धाराशिव लोकसभा लढवण्याची तयारी – ओमराजेंचे आव्हान दानवेनी स्वीकारले, मोस्ट वेलकम 

September 26, 2026
महाराष्ट्र

उपनगराध्यक्षाचा राजीनामा मंजुर – नगरसेवक अमित शिंदे प्रबळ दावेदार, निवड निश्चित

September 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

कला केंद्रातील अंतर्गत वाद – गर्भवती नर्तिकेचा खुन, पेट्रोल टाकून जंगलात जाळले, कळंबचे 4 अटक, 2 फरार

September 28, 2026

वडील आर्थिक संकटात, फाशी घेतील म्हणुन पाठ सोडेना – मुलाला धास्ती, कुटुंबाची व्यथा

September 26, 2026

शेतकऱ्यांना एकरकमी मदत द्या, काय मिळणार हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे – आदित्य ठाकरे

September 26, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp