कर्ज वसुलीच्या नोटीसा, बँकावर कारवाई करा – शिवसेना मदत केंद्र सुरु करणार
धाराशिव – समय सारथी
दुष्काळ जाहीर केला असला तरी मदत तातडीने पोहचणे गरजेचे आहे, मदत टप्प्या टप्प्याने न देता एकरकमी एकाच देणे गरजेचे आहे. काय मदत करणार हे मुख्यमंत्री यांनी जनतेला सांगावे. शेती, पिण्याच्या पाण्याची स्तिथी बिकट आहे. सॅटॅलाइट इमेज माध्यमातून दुष्काळ जाहीर झाला आहे, वर वर पिके हिरवी दिसत असली तरी उत्पन्न येणार नाही. 75 टक्के भागात दुष्काळ कागदावर जाहीर केला असला तरी मदत तात्काळ देणे गरजेचे आहे. सरकार, अधिकारी व सामाजिक संस्था यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन आधार देणे आवश्यक आहे असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.
ठाकरेंना यांनी धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे शेतकरी यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहनी केली. यावेळी माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना प्रवक्ता सुषमा अंधारे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी, सह संपर्क प्रमुख मकरंद राजे निंबाळकर, जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील, संजय निंबाळकर यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत होते.
पीक विमा, मागील वर्षी जाहीर केलेली मदत अजुन आलेली नसुन दुर्दैवाने काही बँका शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठवीत आहेत. कर्जवसुली आताच थांबली पाहिजे व बँकाना मुख्यमंत्री यांनी दम दिला पाहिजे.
लगेच टीका करणाऱ्या राजकीय पक्षापैकी आम्ही नाहीत, मुख्यमंत्री यांना एक दिवसांचा वेळ दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत ही मदत पोहचली पाहिजे. शेतकरी शेतमजुर यांना मदत होणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री यांनी हे सगळे राज्यातील जनतेला सांगितले पाहिजे. धाराशिव जिल्ह्यात भयानक बिकट स्तिथी असुन शालेय विद्यार्थी यांची फीस भरायला पैसे नाहीत.
शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व समुपदेशनासाठी प्रत्येक तालुक्यात शिवसेना मदत केंद्र सुरु करणार असुन शेतकऱ्यांना मदत मिळते की नाही हे पाहणार आहोत. दुष्काळ म्हणुन काय दिले जाणार हे मुख्यमंत्री यांनी जाहीर सांगावे. मागील वर्षी झालेल्या नुकसानीचे पैसे अद्याप काही शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी बांधावर जा असे आदेश उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसैनिकांना दिले आहेत.
सुपर अल निनोमुळे पाऊस कमी पडणार असल्याने शेती धोक्यात आली असुन बेरोजगारी सुद्धा वाढणार आहे. उद्धव ठाकरे यांनी याचं साठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती, हा एक दोन महिन्याचा दुष्काळ नसुन याचा परिणाम अनेक बाबीवर होणार आहे. सुपर अल निनो चा प्रभाव आणखी वाढणार असुन उपाययोजना करण्यासाठी पंतप्रधान यांचा मदत निधी वापरणार आहेत का यावर चर्चा झाली पाहिजे. वातावरनीय बदलाबाबत मी गेली 10 वर्ष बोलत असुन कधी अतिवृष्टी, गारपीठ तर कधी दुष्काळ पडत आहे. यावर चर्चा होणे व उपाययोजना गरजेचे आहे.












