धाराशिव – समय सारथी
डान्स अकॅडमीच्या शिक्षकाने डान्स शिकवण्याचा बहाणा करून एका अल्पवयीन मुलीला जाळ्यात ओढून तिच्यावर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना धाराशिव शहरात घडली असुन पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. डान्स शिक्षकाने अत्याचार केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आलम अस्लम बेग असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव असुन त्याची बार्शी रोड भागातील श्रीकृष्ण नगर येथे ‘आलम’ नावाची डान्स अकॅडमी आहे.
शहरातील एका अल्पवयीन मुलीशी जवळीक साधत आलम याने संपर्क साधला. मुलीचा माझा मोबाईल क्रमांक घेतला होता तेव्हापासुन तो तिला मागील 3 महिने पासुन बोलत होता. आलम याने तिला घरी डान्स शिकवण्यासाठी बोलावले, त्यानुसार मुलगी घरी गेल्यानंतर डान्स न शिकवता तिच्यावर बळजबरीने लैंगिक अत्याचार केले. ही घटना कोणाला सांगू नको अशी धमकी दिल्याने ती सांगितली नाही. मात्र आईला संशय आल्यानंतर तीने घटना सांगितली.
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 कलम 64(1),74,351(2) अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम व पोस्को अंतर्गत धाराशिव शहर पोलिसात पोलिस निरीक्षक कुमार दराडे यांच्या आदेशाने गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश कुमार राऊत हे अधिक तपास करीत आहेत. लव्ह जिहाद चा हा प्रकार असल्याचा आरोप काही संघटनानी केला असुन आहे अश्या किती मुलींना जाळ्यात ओढले याच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.











