धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेतील शिवसेना उबाठा गटाचे नगरसेवक हे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रवेश होणार आहे. शिवसेना उबाठा गटाचे हे नगरसेवक आता महायुतीतील शिंदे गटात जाऊन सत्तेत व विकासाच्या गंगेत सहभागी होणार आहेत. ऑपरेशन लोटस राबविले जात असताना अनेक नाट्यमय घडामोडी, मनधरणी व घोडेबाजारीनंतर ऑपरेशन ‘टायगर’ यशस्वी होत आहे.
सध्या सुरू असलेली नगरसेवक पळवा पळवी म्हणजे लोकशाहीची हत्या. जे ठाकरे परिवाराशी एकनिष्ठ आहेत त्यांना सोबत घेऊन संघर्ष करू अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर यांनी दिली.











