Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

भटक्या कुत्र्यांसाठी निवारा, मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र – 6 शहरात सुविधा, 23 कोटी 14 लाखांचा प्रस्ताव

समय सारथी by समय सारथी
August 12, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
440
VIEWS

धाराशिव – समय सारथी

शहरामधील भटक्या मोकाट कुत्र्यांचा प्रश्न तसेच पाळीव अथवा मोकाट प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यविधीसाठी योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन २०२६-२७ अंतर्गत जिल्ह्यातील नागरी परिक्षेत्रात भटक्या – मोकाट कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करणे तसेच पाळीव-मोकाट प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्याच्या कामास पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी परवानगी दिली आहे.

धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग, उमरगा,मुरूम,कळंब,भूम व परंडा या आठ नगरपरिषदा,तसेच वाशी व लोहारा बु.या दोन नगरपंचायतींचा समावेश होतो.या शहरांमध्ये पाळीव प्राण्यांसाठी अंत्यविधी केंद्र उभारण्यासाठी पालकमंत्र्यांनी दिलेल्या सूचनांनुसार नगरपरिषद क्षेत्रातील उपलब्ध जागांची निश्चिती करण्यात आली आहे.

संबंधित नगर परिषदांकडून याबाबतची अंदाजपत्रके प्रशासकीय मान्यतेसाठी कार्यालयास प्राप्त झाली आहेत. यामध्ये धाराशिव येथे दोन प्रस्ताव असून,एक मोठ्या जनावरांसाठी आणि दुसरा लहान जनावरांसाठी आहे. धाराशिव येथील घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ मोठ्या जनावरांसाठीच्या प्रस्तावाची अंदाजपत्रकीय किंमत ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये,तर लहान जनावरांसाठीच्या प्रस्तावाची अंदाजपत्रकीय किंमत ३ कोटी २४ लाख ८९ हजार रुपये असून,दोन्ही ठिकाणी प्रत्येकी ५ हजार चौरस फूट जागा प्रस्तावित आहे.

तुळजापूर येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ अंत्यविधी केंद्रासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक असून,५ हजार चौरस फूट जागा प्रस्तावित आहे.नळदुर्ग येथे म्हाडा घरकुल शेजारी अंत्यविधी केंद्र उभारण्यात येणार असून,त्यासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये खर्च अपेक्षित आहे.येथेही ५ हजार चौरस फूट जागा प्रस्तावित आहे.

उमरगा येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ अंत्यविधी केंद्रासाठी ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये,भूम येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये,तर परंडा येथे घनकचरा व्यवस्थापन केंद्राजवळ ३ कोटी ३१ लाख ६१ हजार ५०९ रुपये खर्चाचे अंदाजपत्रक आहे.या तिन्ही ठिकाणी प्रत्येकी ५ हजार चौरस फूट जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

प्रस्तावित सर्व कामांची एकूण अंदाजपत्रकीय किंमत २३ कोटी १४ लाख ५८ हजार ५४ रुपये आहे. मात्र मुरूम, कळंब,वाशी व लोहारा या नगरपरिषद/नगरपंचायतींमध्ये जागेअभावी सध्या ही कामे घेता आलेली नाहीत. प्राप्त अंदाजपत्रकांना सक्षम प्राधिकरणाची तांत्रिक मान्यता लवकरात लवकर घेऊन दोन्ही जिल्हा नियोजन समितीपुढे प्रस्ताव सादर करून प्रशासकीय मान्यता घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. मोकाट-भटक्या कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करण्याचेही काम हाती घेण्यात आले आहे. धाराशिव,तुळजापूर,नळदुर्ग,उमरगा, मुरूम,कळंब,भूम,परंडा या आठ नगरपरिषदा तसेच वाशी व लोहारा बु.या दोन नगरपंचायतींचा यामध्ये समावेश आहे.

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी दिलेल्या सूचनांनुसार धाराशिव,तुळजापूर, उमरगा,मुरूम व लोहारा बु.येथे मोकाट- भटक्या कुत्र्यांसाठी निवारा (Dog Shelter) तयार करण्यात आले आहेत. सदर कामात वाढ करणे अथवा दुरुस्ती करण्याची कामे व भूम,परंडा, कळंब,नळदुर्ग आणि वाशी येथे मोकाट- भटक्या कुत्र्यांसाठी निवारा उभारण्याची कामे घेण्यासाठी संबंधित नगरपरिषद/नगरपंचायतींकडून अंदाजपत्रके प्राप्त करून घेण्यात येत आहेत.

Previous Post

हकालपट्टी – शिवसेना नगरसेवक मिर्झा ड्रग्ज तस्करीत आरोपी, आमदार कैलास पाटीलांची भुमिका स्पष्ट

Next Post

प्राणी मित्र पालकमंत्री – उघडा डोळे, बघा नीट – नागरी समस्याकडेही लक्ष द्या, जिवंतपणी नरक यातना

Related Posts

महाराष्ट्र

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026
महाराष्ट्र

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026
महाराष्ट्र

कुलूप – अग्नीतांडव नंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थान विभागाचे कार्यालय बंद, असंवेदनशिलता

November 10, 2026
महाराष्ट्र

हद्दपारी – रोचकरी पिता पुत्राचा प्रस्ताव, देवानंद यांच्यावर 37 तर गणेशवर 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद 

November 8, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

November 7, 2026
महाराष्ट्र

अमानुष मारहाण, प्रेमप्रकरणाचा संशय – एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी, तुळजापूर येथील घटना

November 4, 2026
Next Post

प्राणी मित्र पालकमंत्री - उघडा डोळे, बघा नीट - नागरी समस्याकडेही लक्ष द्या, जिवंतपणी नरक यातना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026

कुलूप – अग्नीतांडव नंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थान विभागाचे कार्यालय बंद, असंवेदनशिलता

November 10, 2026
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp