धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर हे आज दुपारी 4 नंतर धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्ते, पदाधिकारी यांची बैठक घेणार आहे, तालुका निहाय बैठका घेऊन ते पक्षातर बाबतचा निर्णय जाहीर करतील. ओमराजे हे उबाठा गट सोडून शिवसेना शिंदे गटात जाण्याची शक्यता असुन त्यासाठी मते जाणून घेऊन निर्णय घेण्यासाठी ही बैठक आयोजित केली आहे.
कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येचा निकाल लागला असुन या निकाला नंतर राजकीय भुमिका स्पष्ट करू असे ओमराजे यांनी सांगतिले होते. या हत्याकांडात 20 वर्षांनी डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. निकाल व राजकीय भुमिका याचा संबंध नसल्याचे ओमराजे यांनी निकालाआधीच जाहीर केले होते.
ओम राजे हे पक्षांतर करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता जास्त आहे, काही कार्यकर्ते पदाधिकारी आग्रही आहेत तर काही जणांचा एकनिष्ठ, स्वाभिमानी ही ओळख विसरू नये म्हणुन जाण्यास विरोध आहे. काही जण ओमराजे जो निर्णय घेतील तो मान्य आहे अश्या भूमिकेत आहेत त्यामुळे ओमराजे यांचा निर्णय व भुमिका महत्वाची आहे.












