धाराशिव – समय सारथी
माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा टाकणारी कुख्यात टोळीतील 7 जणांना धाराशिव गुन्हे शाखेने अवघ्या 24 तासात अटक करून गुन्ह्याचा उलडा केला. पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने ही दमदार कामगिरी केली.
परंडा तालुक्यातील कुंभेज येथे 25 एप्रिल रोजी मध्यरात्री कॅनॉलचे बाजूला असलेल्या माजी सैनिक विश्वनाथ मुरलीधर जगताप राहत असलेल्या शेतवस्तीवर अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकून चाकूने प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. त्यांच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे दागीने जबरदस्तीने काढुन दरोडा टाकूण पळून गेले.
पोलीस निरीक्षक विनोद इन्जपवार यांचे मार्गदर्शनात सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे व त्यांचे पथकाने तपास केला. कोणतीही सीसीटीव्ही व उपलब्ध पुरावे नसताना आरोपीचे वर्णन व गोपनीय माहिती आणि तांत्रिक पुरावे जमा करून आरोपीना अटक केली.
अनाळा येथील किरण पंडीत शिंदे, राघवा शिंदे, चेतन किरण शिंदे, डोकेवाडी येथील विकास नागेश भोसले, हिवडा ज्ञानेश्वर लिम्या काळे, सुनिल प्रकाश भोसले अंजनसोंडा, अनाळा येथील चेतन किरण शिंदे व सुनिल चरण शिंदे आणि त्याचे इतर साथीदार यांनी केलेली असून सध्या ते सर्वजण डोकेवाडी शिवारात शेतात थांबलेले आहेत अशी माहिती मिळाल्याने लागलीच पोनि विनोद इज्जपवार यांचे मार्गदर्शनात सपोनि खटके, सपोनि मोरे यांचे पथकासह सुयोग्य नियोजन करून अटक केली. त्यांच्याकडून सोने व 2 मोटरसायकल असे 1 लाख 55 हजार मुद्देमाल जप्त केला.
सदरची कामगिरी पोलीस अधिक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधिक्षक श्रीमती शफकत आमना, उपविभागिय पोलीस अधिकारी उप विभाग भुम चोरमले यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोनि चोरमले, सपोनि सचिन खटके, सपोनि अमोल मोरे, सपोनि सुर्वे, पोलीस हवालदार, विनोद जानराव, नितीन जाधवर, वळीराम शंदे, अमोल चव्हाण, शौकत पठाण, दयानंद गाटेकर, राठोड, सपोफौ मुळे, पोलीस नाईक बवन जाधवर, रोहीत दंडनाईक, विनायक दहिहंडे, आरसीपी पथक यांचे पथकाने केली आहे.











