धाराशिव – समय सारथी
एका अल्पवयीन मुलीचे फोटो काढुन तिला ब्लॅकमेल करून लैंगिक अत्याचार केल्याची घटना धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. मुलगी क्लासेसला शिकायला जात असताना तिचा पाठलाग करण्यात आला, स्नॅप चॅटवर मैत्री करून तिला जाळ्यात ओढत लैंगिक अत्याचार करण्यात आले. लग्नाचे आमिष दाखवून, गुंगीचे औषध देऊन फोटो काढुन तिला ब्लॅकमेल केल्याचा हा प्रकार आहे. पोलिसांनी आरोपीला अटक करून पोस्कोसह अन्य कलमानव्ये गुन्हा नोंद केला आहे.
तुळजापूर शहरातील एका सायन्स अकॅडमीमध्ये पिडीत मुलगी क्लासेससाठी जात होती, तिथे 20 वर्षीय साहिल सलीम शेख हा तिचा पाठलाग करीत असे, तिला त्याने अनेक वेळा नंबर मागितला मात्र तीने नकार दिल्यावर मुलीच्या स्नॅप चॅटवर रिक्वेस्ट पाठवली व तिला सतत मेसेज केले. मुलीला हे प्रकरण मिटवून घेऊ असे सांगत तिला लातुर बसस्थानक येथील बॉलीवुड कॅफे येथे नेले व तिला मँगो ज्यूस व इतर पदार्थात गुंगीचे औषध टाकून खायला दिले.
आठवडाभरानंतर साहिलने तिला पुन्हा भेटायला बोलावले, तीने नकार दिल्यावर त्याने तीच्या नंबरवर दोघे जवळ असल्याचा व किस करीत असल्याचा फोटो पाठवला, लग्नाचे आमिष व विविध कारणे देत त्याने लैंगिक अत्याचार केला. एका वेळी त्याच्या मोबाईलमध्ये इतर मुलीसोबत मेसेज केल्याचे सापडले, ते मित्रांचे आहेत असे साहिल सांगत असे. तू लग्न नाही केलेस ? कुठे जरी गेलीस तरी तुला सोडणार नाही? तुझे फोटो व्हायरल करून बदनामी करेल अशी धमकी तो द्यायचा. या त्रासाला कंटाळून पोलिसात तक्रार दाखल केली.
भारतीय न्याय संहिता कलम 74, 75(1)(ii),76, 78(1)(ii), 79, 351(2) बालकांचे लैंगीक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 8 व 12 आणि आयटी ऍक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे हे तपास करीत आहेत. गेल्या 2 वर्षापासुन हा प्रकार सुरु होता. आरोपीने इतर काही मुलींचे अश्याच प्रकारे शोषण केले असुन ‘लव्ह जिहाद’चा व्यापक प्रकार आहे असा आरोप काही संघटनानी केला आहे.












