धाराशिव – समय सारथी
आमदार तथा मित्रा या संस्थेचे उपाध्यक्ष राणाजगजीतसिंह पाटील हे 24 व 25 एप्रिल रोजी मॅरेथॉन बैठका घेणार आहेत. धाराशिव जिल्ह्यातील झालेल्या अवकाळी पाऊस नुकसानी सोबत ते विविध विकास कामे, प्रलंबित प्रकल्प, त्यांची प्रगती याचा आढावा घेणार आहेत. धाराशिव जिल्ह्यात ग्लोब फोर्ज लिमिटेड ही कंपनी 15 हजार 430 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक करणार असुन यातून 3 हजार 600 रोजगार निर्मिती होणार आहे, त्यामुळे उद्योग निर्मितीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत, त्यासाठी आमदार पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.
24 एप्रिल रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयबाबत महाविद्यालयात सकाळी 10 वाजता, डायट कॉलेज येथे 11 वाजता, जिल्हाधिकारी कार्यालय येथे 11.30 वाजता नगर परिषद धाराशिव पाणीपुरवठा योजनेचा आढावा, 12 वाजता धाराशिव जिल्ह्यातील आरोग्य शिबिरे नियोजन बाबत आढावा बैठक, 12.30 वाजता अवकाळी पाऊस व गारपीठ मुळे झालेल्या नुकसानीबाबत आढावा, खरीप 25 पीकविमा व शेत रस्त्याबाबत बैठक घेतील. 5 वाजता धाराशिव जिल्यातील District Flagship Project संबंधित सनियंत्रण अधिकारी यांचे प्रकल्पाबाबत सादरीकरण व आढावा बैठक घेतील.
25 एप्रिल रोजी शासकीय विश्रामगृह शिंगोली येथे सकाळी 11 वाजता येडशी येथील रामलिंग तीर्थक्षेत्र आणि अभयारण्य विकसित करून पर्यटनाला चालना देणे, श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखडा अंतर्गत तुळजापूर येथे प्राणी संग्रहालय उभारणे, वन विभागांतर्गत वृक्ष लागवड अभियान व इतर केलेली कामे यांचा आढावा घेतील. 11.30 वाजता धाराशिव येथील क्रीडासंकुल बाबत बैठक, दुपारी 12 वाजता शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना यांचा प्रसार व प्रसिद्धी बाबत बैठक, दुपारी 2 वाजता तुळजाभवानी मंदिर या राज्यसंरक्षित स्मारकाच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या जतन संवर्धन व विकास कामाबाबत आढावा बैठक, सायंकाळी 5 वाजता तेर येथील संत गोरोबाकाका मंदिर परिसरातील विकासकामे तसेच पुरातत्व विभागामार्फत सुरु असलेल्या विकास कामांबाबत आढावा घेतील.












