Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

भव्य दिव्य मिरवणुक – डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, बहुजन योद्धा संघटना – मनोज जरांगे पाटील धाराशिवला येणार

समय सारथी by समय सारथी
April 16, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
572
VIEWS

धाराशिव – समय सारथी

बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या बोधिसत्व, विश्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने  धाराशिव शहरात 22 एप्रिल रोजी सायंकाळी भव्यदिव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.  तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रमांनी जयंती उत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. यंदाच्या मिरवणुकीला मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील उपस्थित राहून मिरवणुकीचे उद्घाटन करणार असल्याची माहिती बहुजन योद्धा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा जयंती समितीचे मार्गदर्शक धनंजय (नाना) शिंगाडे यांनी दिली.

धाराशिव शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण सूर्यवंशी, कार्याध्यक्ष सुधीर पवार, बलराज रणदिवे,, मसूद शेख, माजी नगरसेवक खालील सय्यद, नगरसेवक अजहर मुजावर, आयाज शेख, सतीश कदम, रोहीत पडवळ, लक्ष्मण माने, पांडू भोसले,  अभिजित सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

शिंगाडे यांनी सांगितले की, बहुजन योद्धा सामाजिक संघटनेमार्फत गेली 32 वर्षापासून धाराशिव येथे विविध समाजोपयोगी कार्यक्रमाने जयंती उत्सव साजरा करण्यात येतो. महापुरुषांचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य संघटना सातत्याने करत आहे .मिरवणुकीत महिला, पुरूष, युवक मोठ्या संख्येने सहभागी होतात.

विशेष म्हणजे जयंती उत्सव समितीमध्ये सर्व जाती-धर्मातील व्यक्तींचा समावेश असून दरवर्षी आगळ्यावेगळ्या पद्धतीने विशेषतः पारंपारिक वाद्यांच्या गजरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात येते. तसेच रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, रुग्णांना फळे वाटप, वृक्ष लागवड यासह विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

जयंती उत्सव समितीच्या वतीने यावर्षी देखील विविध राज्यातील पारंपारिक वाद्य समूहांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे ही मिरवणूक वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.  सध्या जगात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांचा देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. तसेच जयंती उत्सव समितीच्या वतीने विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

22 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता जिजाऊ चौक येथून मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे. सायंकाळी धाराशिव शहरातील क्रांती चौक भीमनगर येथून भव्यदिव्य मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.  शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मिरवणुकीची सांगता होणार आहे. या भव्यदिव्य मिरवणुकीत सर्व जाती-धर्मातील आंबेडकरी विचारांच्या नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही शिंगाडे यांनी केले.

Previous Post

हल्ला, तहसीलदार निलेश काकडे यांची गाडी अडवली – वाळूचा प्रश्न, गुन्हा नोंद – आंदोलनाचा इशारा

Next Post

15 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई – 1 कायमस्वरूपी रद्द, खत व बियाणे विक्रीत अनियमितता उघड

Related Posts

महाराष्ट्र

विशेष लेखा परीक्षण – सोमवार पासुन सुरुवात, धाराशिव नगर परिषदेचा 27 कोटींचा कथित घोटाळा

July 26, 2026
महाराष्ट्र

आपला जीव धाराशिव – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

July 26, 2026
महाराष्ट्र

तांत्रिक निकष रद्द करा – पीक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा वितरीत करा 

July 25, 2026
महाराष्ट्र

कलाकृती – 1 एकर शेतामध्ये गवताच्या सहाय्याने साकारली विठ्ठलाची प्रतिकृती

July 25, 2026
महाराष्ट्र

वारकरी परंपरेचा गौरव – धाराशिव जिल्ह्याला मुख्यमंत्री सोबत शासकीय महापुजेचा मान

July 25, 2026
महाराष्ट्र

धाराशिव जिल्हा पालक सचिवपदी डॉ राजेश देशमुख यांची नियुक्ती

July 24, 2026
Next Post

15 कृषी सेवा केंद्रांवर कारवाई - 1 कायमस्वरूपी रद्द, खत व बियाणे विक्रीत अनियमितता उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

विशेष लेखा परीक्षण – सोमवार पासुन सुरुवात, धाराशिव नगर परिषदेचा 27 कोटींचा कथित घोटाळा

July 26, 2026

आपला जीव धाराशिव – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंच्या स्वागताची जय्यत तयारी

July 26, 2026

तांत्रिक निकष रद्द करा – पीक कापणी प्रयोगाच्या आधारे विमा वितरीत करा 

July 25, 2026
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp