Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

50 टीएमसी पाणी – प्रकल्प अहवालासाठी 24 कोटी मंजुर

समय सारथी by समय सारथी
July 22, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
723
VIEWS

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात येणार – आमदार पाटील 

धाराशिव – समय सारथी

पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे 50 टीएमसी पाणी मराठवाड्यात आणण्याच्या व्यवहार्यता अहवालानंतर आता ‘डीपीआर’च्या कामास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी 24 कोटी निधी दिल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांना दरवर्षी बसणाऱ्या पुराच्या तडाख्यातून मुक्त करून ते समुद्राला वाहूंजनारे अतिरिक्त पाणी दुष्काळी मराठवाड्याकडे वळवण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी आखलेल्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता गती मिळाली आहे. या प्रकल्पाचा ‘व्यवहार्यता अहवाल’ (Feasibility Report) सकारात्मक आल्यानंतर, आता आपल्या महायुती सरकारने’सविस्तर प्रकल्प अहवाल’ (DPR) तयार करण्यास प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यासाठी 24 कोटी 5 लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. 

धाराशिव, लातूर आणि सोलापूरसह संपूर्ण मराठवाड्याचा दुष्काळी प्रश्न यामुळे पुर्णतः पुसून निघणार आहे. मराठवाड्याच्या दुष्काळी प्रश्नासाठी हे एक मोठे उत्तर ठरणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.कृष्णा खोऱ्यात पावसाळ्यात अतिरिक्त होणारे आणि समुद्राला वाहून जाणारे 50 अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे मराठवाड्याच्या दिशेने वळवण्यात येणार आहे.

कोल्हापूर-सांगली भागातील पुराचे संकट टाळून हे पाणी दुष्काळी भागातील सिंचनासाठी आणि पिण्यासाठी वापरण्याचे मोठे नियोजन आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस स्वतः या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आग्रही आहेत. या प्रकल्पामुळे मराठवाड्यातील अत्यंत दुष्काळी मानल्या जाणाऱ्या धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघणार आहे. सोबतच शेजारच्या सोलापूर जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रालाही याचा मोठा फायदा होणार आहे. यापूर्वी तांत्रिकदृष्ट्या हे पाणी वळवणे शक्य आहे का, याचा अभ्यास करण्यासाठी जागतिक बँकेची तांत्रिक सल्लागार असलेल्या ‘ट्रॅकबेल’ या संस्थेने अभ्यास करून व्यवहार्यता अहवालात सकारात्मक दिला आहे. 

व्यवहार्यता अहवालास हिरवा कंदील मिळाल्यानंतर आता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यास प्रशासकीय मान्यवर मिळाल्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतून वाहून जाणारे पुराचे 50 अब्ज घनफूट पाणी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळी भागासाठी उपलब्ध होणार आहे. अंदाजे 16 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकेल असा अंदाज आहे. 

आशियाई विकास बँकेच्या सहाय्याने तयार करण्यात आलेल्या पूर्व संभाव्यता अहवालानुसार हा प्रकल्प दोन टप्प्यांत राबविण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात कृष्णा नदीवरील सापटेवाडी बंधाऱ्यापासून नीरा नदीवरील उद्धट बंधाऱ्यापर्यंत, तर दुसऱ्या टप्प्यात उद्धट बंधाऱ्यापासून उजनी धरणापर्यंत पाणी नेण्याचे नियोजन आहे. या दोन्ही टप्प्यांसाठी आवश्यक तांत्रिक सर्वेक्षण, अन्वेषण आणि डीपीआर तयार करण्यासाठी शासनाने निधी मंजूर केला आहे. 

पुराचे अतिरिक्त पाणी वाहून आणण्यासाठी सुमारे 100 किलोमीटर लांबीचा नवीन बोगदा आणि अस्तित्वात असलेल्या बोगद्यांची क्षमता वाढवणे, अशा तांत्रिक बाबींचाही या कामात समावेश असणार आहे. दुष्काळग्रस्त मराठवाड्याला पाणी देण्यासाठी आजवर अनेक योजना आखल्या गेल्या, मात्र 50 टीएमसी पाणी वळवण्याची ही योजना सर्वाधिक प्रभावी ठरणार आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पासह या नवीन योजनेमुळे मराठवाड्याच्या शेतीचे आणि उद्योगांचे चित्र पूर्णपणे पालटू शकेल असा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Previous Post

धाराशिव बीड संभाजीनगर रेल्वे – 240 किमीच्या प्रकल्प अहवालासाठी मंजुरी, सर्वेक्षणाचे काम सुरु – विकासाला गती

Next Post

काँग्रेस आक्रमक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Related Posts

महाराष्ट्र

घोटाळा, अभय – 29 शेतकरी उत्पादक तर 2 निर्मिती कंपनी – 14 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन तर कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 7, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज रॅकेट, पुणे व बीड कनेक्शन – 2 आरोपी निष्पन्न, 2 आरोपीना सोमवारपर्यंत वाढीव पोलिस कोठडी

August 7, 2026
महाराष्ट्र

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना – 155 कामांची पडताळणी पूर्ण, अनियमितता आढळली नाही, क्लीन चीट

August 6, 2026
महाराष्ट्र

राजकीय प्रवास आठवा, पक्ष सोडावा लागला हेच मोठ उत्तर – सुजितसिंह ठाकुरांचे प्रश्न

August 6, 2026
महाराष्ट्र

शिस्तभंग, विभागीय चौकशी – कृषी विभागातील 15 अधिकाऱ्यांचे निलंबन, 10 दिवसात उत्तराचे आदेश

August 6, 2026
महाराष्ट्र

बडतर्फ करून गुन्हा नोंद करा – निविष्ठा घोटाळा, 15 कृषी अधिकारी निलंबित, आमदार कैलास पाटीलांची मागणी

August 6, 2026
Next Post

काँग्रेस आक्रमक, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

घोटाळा, अभय – 29 शेतकरी उत्पादक तर 2 निर्मिती कंपनी – 14 कृषी अधिकाऱ्यांचे निलंबन तर कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 7, 2026

ड्रग्ज रॅकेट, पुणे व बीड कनेक्शन – 2 आरोपी निष्पन्न, 2 आरोपीना सोमवारपर्यंत वाढीव पोलिस कोठडी

August 7, 2026

गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार योजना – 155 कामांची पडताळणी पूर्ण, अनियमितता आढळली नाही, क्लीन चीट

August 6, 2026
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp