धाराशिव / कळंब – समय सारथी
कळंब शहरात ड्रग्जचा साठा जप्त करण्यात आला असुन ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीतील 2 जणांना पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. या 2 आरोपीना कोर्टाने शुक्रवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावणी आहे. कळंब शहरात ड्रग्ज असल्याची चर्चा गेली अनेक वर्षापासून होती, त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या कारवाईनंतर पुष्टी मिळाली आहे. ड्रग्ज तस्करीचा म्होरक्या कोण ? हे ड्रग्ज कोणाला पुरविले जात होते, यासह अन्य बाबींचा तपास पोलिस निरीक्षक शकील शेख हे करीत आहेत.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना अटक केली आहे. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या असुन आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधीक्षक विनोद इज्जपवार यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक इज्जपवार यांच्या तक्रारीनंतर निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे यांच्या विरोधात कळंब पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असुन कळंब पोलीस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत, 4 दिवसांच्या पोलिस कोठडीत अनेक बाबी समोर येणार आहेत.
यापुर्वी देखील स्थानिक गुन्हे शाखेने तामलवाडी येथे कारवाई करून तुळजापूर येथील ड्रग्जचे रॅकेट उध्वस्त केले होते त्यानंतर पुन्हा स्थानिक गुन्हे शाखेने कळंब येथील रॅकेट उध्वस्त केले. पोलीस ठाणे कळंब येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 326/26 अन्वये एन डी पी एस कायदा कलम 8(क), 22( ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था.गु.शा. धाराशिव , सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली आहे










