धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरापासुन हाकेच्या अंतरावर असलेल्या येडशी येथील एकाच कुटुंबातील 6 जणांचा होरपळून दुर्दैवी अंत झाल्यासह तुळजापूर येथील अग्नी तांडवाची घटना ताजी असतानाच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचा अजब कारभार पहायला मिळाला. जिल्हाधिकारी कार्यालयात असलेला जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखा कार्यालय कुलूपबंद असल्याचे समोर आले.
दिवाळीच्या सणात आग लागण्यासह अन्य दुर्घटना घडू शकतात मात्र याचे गांभीर्य अजुन आलेले दिसत नाही. एखादी आपत्ती आल्यास त्याचे नियोजन व समन्व्यक यासह उपाय योजनेच्या अनुषंगाने हा विभाग आणि त्याचे कार्य महत्वाचे आहे. 24 तास हा विभाग अलर्ट व खुला असणे गरजेचे असतानाही कार्यालयला मात्र कुलूप होते. अग्निशमन गाडी नसल्याचे, नादुरुस्तीसह अन्य तांत्रिक अडचणी असल्याचे अनेकदा उघड झाले असतानाच हा प्रकार समोर आला आहे.











