धाराशिव – समय सारथी
ऑपरेशन टायगरच्या अनुषंगाने शिवसेना उबाठा गटाच्या 6 खासदाराना Y+ सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यासह अन्य खासदार यांना सुरक्षा देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने 17 जुनला घेतला आहे. ओमराजे हे सध्या पुण्यात असल्याचे कळते.
संजय जाधव, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर,ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे व संजय दिना पाटील यांना सुरक्षा दिली आहे. Y+ सुरक्षा श्रेणीत साधारणपणे सशस्त्र सुरक्षा कर्मचारी, वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) सह 24 तास सुरक्षा व्यवस्था दिली जाते. संबंधित व्यक्तीच्या धोक्याच्या आकलनानुसार सुरक्षा यंत्रणा तैनात केली जाते.











