धाराशिव – समय सारथी
6 खासदारांनी शिवसेना उबाठा गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे सक्रीय झाले असुन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात ते धाराशिव येथे 28 जुन रोजी येऊन त्यांच्या विरोधात रणशिंग फुंकणार आहेत. ठाकरे काय बोलतात याकडे लक्ष लागले आहे. आमदार कैलास पाटील हे उबाठा गटाची खिंड लढवीत आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे 26 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्रातील सहा बंडखोर खासदारांच्या मतदारसंघांचा दौरा करणार आहेत. यवतमाळ, वाशिम, हिंगोली, धाराशिव, परभणी आणि शिर्डी या 6 लोकसभा मतदारसंघांत जाऊन ते स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.
26 आणि 27 जून रोजी यवतमाळ, वाशिम आणि हिंगोली तर 28 जून परभणी आणि धाराशिव व 29 जूनला शिर्डी येथे जाणार आहेत.











