धाराशिव – समय सारथी
30 वर्षे निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांनी काय केलं, असा प्रश्न विचारणाऱ्यांनी आधी स्वतःचा राजकीय प्रवास आठवावा. ज्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रक्ताचं पाणी करून भाजप गावागावात पोहोचवला, त्याच कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळे अनेकांना स्वतःचा पक्ष सोडून भाजपमध्ये यावे लागले अशी पोस्ट माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सोशल मीडियावर केली आहे.
भाजपमध्ये येण्याची वेळ तुमच्यावर आली, हेच त्या जुन्या कार्यकर्त्यांच्या 30 वर्षांच्या संघर्षाचं आणि निष्ठेचं सर्वात मोठं उत्तर आहे. संघर्ष केलेल्यांना प्रश्न विचारण्यापेक्षा त्यांच्या त्यागाचा सन्मान करायला शिका. कारण पक्षाची पायाभरणी करणारे कार्यकर्ते नसते, तर आज भाजपमध्ये येण्याची संधीही निर्माण झाली नसती. ताई साहेब…. अशी पोस्ट ठाकूर यांनी करीत काही प्रश्न उपस्थितीत केले आहेत.
धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या जुने व निष्ठावंत कार्यकर्ते व नेत्यांना माझी एक विचारणं आहे. मी लहान तोंडी मोठा घास घेत आहे पण आज स्वतःला निष्ठावंत म्हणता तर मागील 30 वर्षांमध्ये भाजपच्या पक्ष संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान केले होते. त्याला माजी आमदार ठाकूर यांनी उत्तर दिले आहे.
तुमच्या कार्यकाळामध्ये तुमच्या कार्यकारिणीमध्ये कोणत्याही एखाद्या स्थानिक स्वराज्य संस्थेवरती भारतीय जनता पार्टीची सत्ता होती असे दाखवून द्यावे. विनाकारण एखाद्या वरती हेतूपुरस्कर आरोप किंवा निंदा करू नये. राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रवेशानंतर स्वतः भारतीय जनता पार्टीकडून तुळजापूर तालुक्यामध्ये आमदार म्हणून भरघोस मतांनी निवडून आले. त्यानंतरचा कालखंड आपण पाहत आहोत आणि पाहत होतो आणि पाहत आहोत. 11 पंचायत समिती पैकी 8 पंचायत समितीवर महायुती व भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे. त्यानंतर धाराशिव जिल्हा परिषदेवरती भारतीय जनता पार्टी व महायुतीने एक हाती सत्ता मिळवत आजपर्यंतच्या काँग्रेसच्या व इतर पक्षांच्या सत्ता समीकरणाला खंडित पाडत सत्ता स्थापन केली असे पाटील यांनी म्हण्टले होते.











