Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

जप्तीचे आदेश – विठ्ठल साई व गोकुळ कारखान्याला साखर आयुक्तांचा दणका, शेतकऱ्यांची कोट्यावधींची बिले थकीत

समय सारथी by समय सारथी
June 30, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
92
VIEWS

गोकुळकडे 130 कोटी तर विठ्ठल साईकडे 10 कोटी 76 लाख 

धाराशिव – समय सारथीशे

तकऱ्यांच्या ऊसाची हक्काची एफआरपी न देणाऱ्या 3 साखर कारखान्यांवर साखर आयुक्त डॉ संजय कोलते यांनी महसूल वसुली प्रमाणपत्र (RRC) अंतर्गत जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारखान्यांची मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करण्याचे आदेश धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील मुरूम येथील विठ्ठल साई व गोकुळ शुगर या 2 कारखान्याचा यात समावेश आहे. गोकुळ शुगरने शेतकऱ्याची काही देणी द्यायला 29 जुन पासुन सुरुवात केली आहे. आमदार बसवराज पाटील हे विठ्ठल साईचे चेअरमन असुन कारखान्याला अश्या कारवाईला प्रथमच सामोरे जावे लागत आहे.

विठ्ठल साई शुगर फॅक्टरी, मुरूम धाराशिव या कारखान्याने शेतकऱ्यांचे 10 कोटी 76 लाख रुपये एफआरपी थकीत आहे. कमलाभवानी शुगर फॅक्टरी, सोलापूर शेतकऱ्यांचे 19 कोटी एफआरपी थकीत आहेत तर अष्टलक्ष्मी शुगर, नाशिक यांचे 2 कोटी 62 लाख शेतकऱ्याची देणी थकीत आहेत. या 3 कारखान्यांसह एकूण 10 साखर कारखान्यांवर जप्तीची कारवाई सुरू असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे एकूण 255 कोटी वसूल करून दिले जाणार आहेत.

धाराशिवच्या ‘विठ्ठलसाई’ ने शेतकऱ्यांना 65.47 कोटी रुपये एफआरपीपोटी वाटले परंतु एकूण केलेले 3 लाख 14 हजार 755 टनाचे गाळप बघता शेतकऱ्यांना 10 कोटी 76 लाख रुपये थकविल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी साखर आयुक्तालयात झालेल्या सुनावणीत ‘विठ्ठलसाई’च्या प्रशासनाला समाधानकारक माहिती देता आली नाही. त्यामुळे कारखान्यावर आयुक्तांनी ‘आरआरसी’ अंतर्गत कारवाई केली आहे. कायद्यानुसार ऊस गाळप झाल्यानंतर 14 दिवसांत शेतकऱ्यांना एफआरपी मिळणे बंधनकारक आहे

गोकुळ शुगर्स लि. सोलापूर यांच्याकडे सर्वाधिक 130 कोटी रुपयांची थकबाकी आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 34 गावांमधील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे तब्बल 130 कोटी रुपयांचे एफआरपी बिल थकवले आहे. साखर आयुक्त यांच्या परवान्याशिवाय विनापरवाना गाळप करणेसह अन्य बाबी आहेत. थकबाकीवर 15 टक्के दराने व्याज आकारण्याचेही साखर आयुक्तांच्या आदेशात नमूद आहे. 

गोकुळ साखर कारखान्याने चेन्नई येथील एका कंपनीला 15 कोटी रुपयांना फसवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता शिंदे हे चेअरमन असुन ते भाजप पक्षाशी संबंधित आहेत. शेतकऱ्यांनी जवळपास 20 दिवस आंदोलन केले होते. 29 जुन ते 3 जुलै या काळात 987 शेतकऱ्यांचे पैसे दिले जाणार असुन उर्वरीत बील सोमवार ते शुक्रवार या काळात वेळापत्रक जाहीर करून दिले जाईल अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली.

चेन्नई येथील ‘ईआयडी पॅरी इंडिया लि.’ (EID Parry India Ltd.) या कंपनीची 15 कोटी 72 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गोकुळ साखर कारखान्याचे संचालक गणपत दत्ता शिंदे, मॅनेजिंग डायरेक्टर दत्ता बलभीम शिंदे, डायरेक्टर विशाल गणपत शिंदे आणि सीएफओ कपील बलभीम शिंदे यांच्यावर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

गोकुळ शुगरने बी हेवी मोलॅसिस व सी हेवी मोलॅसिस देण्याचा करार केला. सप्टेंबर 2024 मध्ये नवी पेठेतील युवा गारमेंट शोरूम येथे हा व्यवहार झाला. त्यानुसार कंपनीकडून अडव्हान्स म्हणून बी हेवी मोलॅसिससाठी 9 कोटी 20 लाख रुपये आणि सी हेवी मोलॅसिससाठी 6 कोटी 52 लाख 50 हजार रुपये असे 15 कोटी 72 लाख 50 हजार रुपये ब्रह्मदेवदादा माने सहकारी बँकेतील कारखान्याच्या अकाऊंटवर आरटीजीएसने घेतली नंतर एकाच्या पत्नीच्या खात्यावर तसेच युवा गारमेंट दुकानाच्या खात्यावर सदर रक्कम वर्ग करून घेतली. गोकुळ शुगर इंडस्ट्रीज लिमिटेडविरुद्ध एनसीएलटी, मुंबई खंडपीठ क्रमांक 1 येथे दिवाळखोरीसंदर्भातील अंतिम आदेश 27 जून 2024 रोजी झालेला असतानाही ही बाब कंपनीपासून लपवून करार करून फसवणूक केली. 

भीमा सहकारी साखर कारखाना सोलापूर 30 कोटी 22 लाख, केदारेश्वर सहकारी साखर कारखाना अहिल्यानगर 22 कोटी 44 लाख, सचिन घायळ शुगर्स प्रा. लि. 19 कोटी 49 लाख, श्री संत कूर्मदास सहकारी साखर कारखाना 15 कोटी 97 लाख, भीमाशंकर शुगर मिल्स लि 12 कोटी 26 लाख थकबाकी आहे. कारखान्याची साखर, जमीन किंवा यंत्रसामग्री जप्त करून आणि तिचा लिलाव करून शेतकऱ्यांचे थकीत पैसे वसूल केले जातील.

Previous Post

शेतकऱ्यांना सिबिलवरुन कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार का ?

Related Posts

महाराष्ट्र

शेतकऱ्यांना सिबिलवरुन कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार का ?

June 29, 2026
महाराष्ट्र

मावस भावाच्या खुनाप्रकरणी आरोपीला जन्मठेप – 25 हजारांचा दंड, धाराशिव कोर्टाचा निकाल 

June 29, 2026
महाराष्ट्र

पत्नी व प्रियकर पिडीत पती – गुन्हा नोंद व कारवाईची मागणी, वटपौर्णिमेच्या दिवशी उपोषण आंदोलन 

June 29, 2026
महाराष्ट्र

ऑपरेशन ‘टायगर’ नव्हे ‘तुडवा’ – अंबादास दानवे

June 29, 2026
महाराष्ट्र

किंग मेकर, लोकनायक – 2029 भावी खासदार मल्हार पाटील – वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर, ‘टीम मल्हार’ मैदानात

June 29, 2026
महाराष्ट्र

गद्दार, डरपोक, भामटा व सोंगाड्या – 100 कोटीला विकले, खासदार राऊतांचा ओमराजेंवर घणाघात

June 29, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जप्तीचे आदेश – विठ्ठल साई व गोकुळ कारखान्याला साखर आयुक्तांचा दणका, शेतकऱ्यांची कोट्यावधींची बिले थकीत

June 30, 2026

शेतकऱ्यांना सिबिलवरुन कर्ज नाकारणाऱ्या बँकांवर कारवाई करणार का ?

June 29, 2026

मावस भावाच्या खुनाप्रकरणी आरोपीला जन्मठेप – 25 हजारांचा दंड, धाराशिव कोर्टाचा निकाल 

June 29, 2026
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp