Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

खुल जा सिम सिम… सील उघडले – धाराशिव लोकसभेला अवघ्या काही तासात सुरुवात, उत्सुकता शिगेला 

समय सारथी by समय सारथी
June 4, 2024
in महाराष्ट्र
0
0
SHARES
13
VIEWS

धाराशिव – समय सारथी 

धाराशिव लोकसभा मतमोजणीला अवघ्या काही तासात सुरुवात होणार असुन ईव्हीएम असलेल्या रूमचे सील उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे आणि इतर अधिकारी यांच्या उपस्थितीत उघडण्यात आले आहे. सकाळी 8 वाजता सुरुवातीला 9 हजार 231 पोस्टल मतांची मोजणी सुरु होईल त्यानंतर ईव्हीएम पेटीतील मते मोजण्यास सुरुवात होईल. सरासरी एका राऊंडला 25-30 मिनीट लागु शकतात. कलम 144 लागु केले असुन पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. 

महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर व महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात सरळ लढत झाली आहे. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर हे कोणासाठी तारक मारक ठरतात याकडे लक्ष लागले आहे.

लोकसभेची मतमोजणी 6 विधानसभा मतदार संघात 14 टेबलवर एक राऊंड अशी होणार आहे, एका राऊंडमध्ये 84 मतदान केंद्र मोजली जाणार आहेत. धाराशिव लोकसभेत 2 हजार 139 मतदान केंद्र आहेत.  

धाराशिव लोकसभेतील 8 आमदार ( मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, अभिमन्यू पवार, राजाभाऊ राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज संस्था आमदार सुरेश अण्णा धस ) व इतर पक्षातून आलेले अनेक स्थानिक नेते, माजी आमदार हे महायुतीच्या बाजूने आहेत तर महाविकास आघाडीकडे धाराशिवचे एकमेव आमदार कैलास पाटील व इतर नेते आहेत. सर्व दिग्गज आमदार विरुद्ध ओमराजे निंबाळकर व महाविकास आघाडी अशी ही रंजक लढत आहे. 

2024 ला धाराशिव लोकसभेत 63.88 टक्के मतदान झाले आहे.19 लाख 92 हजार 737 मतदार पैकी 12 लाख 82 हजार 290 मतदान झाले असुन त्यात ईव्हीएमद्वारे 12 लाख 72 हजार 969 तर पोस्टल 9 हजार 231 मतदान झाले आहे. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 45 हजार 627 मतदान झाले त्यापाठोपाठ धाराशिव विधानसभा मतदार संघात 2 लाख 34 हजार 106 मतदान झाले त्यामुळे या 2 मतदार संघाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 68 हजार 137 इतके मतदान जास्त झाले त्यामुळे तेही महत्वाचे ठरणार आहे.

औसा विधानसभा 22 राऊंड, उमरगा 23, तुळजापूर 29, धाराशिव 30, परंडा 27 व बार्शी येथे 24 मतमोजणीचे राऊंड होणार आहेत. 

2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे निंबाळकर यांना 49.5 टक्के तर राणाजगजीतसिंह पाटील यांना 38.9 टक्के मते मिळाली होती. 

Previous Post

कलम 144 लागु – लोकसभा निकालाच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय अधिकारी डव्हळे यांचे आदेश, या गोष्टीना असणार बंदी 

Next Post

धाराशिव लोकसभा – ओमराजे निंबाळकर यांना 3 लाख 29 हजार 846 मतांची आघाडी, सर्व ठिकाणी लीड

Related Posts

महाराष्ट्र

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025
महाराष्ट्र

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
महाराष्ट्र

धाराशिव नगर परिषद घोटाळा – अपर जिल्हा पोलिस अधीक्षक नोडल अधिकारी, एसआयटी चौकशी

July 2, 2025
महाराष्ट्र

तो साहेब कोण ? निष्पन्न – लाचलुचपत विभागाला आव्हान, 3 लाख दिल्याचा दावा – 4 लाखांची लाच प्रकरण, पोलीस कोठडी, निलंबन

July 2, 2025
महाराष्ट्र

लुटीचा बनाव उघड – 25 लाख जप्त, बँक मॅनेजर गजाआड – ऑनलाईन गेमच्या नादात कर्जबाजारी, धाराशिव पोलिसांची कारवाई 

July 2, 2025
Next Post

धाराशिव लोकसभा - ओमराजे निंबाळकर यांना 3 लाख 29 हजार 846 मतांची आघाडी, सर्व ठिकाणी लीड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

‘तो’ साहेब कोण ? कोडं – 4 लाखांचे लाच प्रकरण – आरोपी शेखला आज कोर्टात हजर करणार, दबाव ? ठाण्यातील सीसीटीव्ही तपासण्याची गरज 

July 3, 2025

ड्रग्ज तस्करी गुन्हा – 3 जुलैला सुनावणी, 15 आरोपी फरार, पुरवणी दोषारोपपत्र, कडक कारवाई – पोलिस अधीक्षक खोखर

July 2, 2025

खाते अंतर्गत चौकशी, अनेक तक्रारी – लाच प्रकरणात पोलिस निरीक्षक शेळके अडचणीत, पोलीस अधीक्षक रितु खोखर यांची माहिती

July 2, 2025
July 2025
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
28293031  
« Jun    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp