धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांच्या गाडीचा चालक समद काझी दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल देण्यासाठी आणखी काही दिवस लागतील असे म्हणत कोर्टाने निकालाची तारीख वाढवली आहे. 16 जुन रोजी निकाल अपेक्षित होता मात्र 20 जुनला कोर्ट निकाल जाहीर करणार आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपीना कोर्टात हजर राहण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत.
मुंबईतील अतिरिक्त सत्र न्यायाधीश तथा विशेष न्यायाधीश एस आर नावंदर यांच्या कोर्टात सुनावणी सुरु आहे. आजच्या सुनावणीला पवनराजे निंबाळकर यांच्या पत्नी आनंदीदेवी, मुलगा खासदार ओमराजे, डॉ जयप्रकाश राजे तर काझी यांच्या पत्नी व मुलगा हजर होते तर डॉ पद्मसिंह पाटील हे ऍम्ब्युलन्समधुन व्हील चेअरवर आले त्यांच्या सोबत मुलगा आमदार राणाजगजीतसिंह पाटील व पृथ्वीराज पाटील होते.











