मांडीला मांडी नाही तर उरावर बसणार – तडजोड नाही, त्यांच्यासाठी मत नाही मागणार
धाराशिव – समय सारथी
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर हे उबाठा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ करून शिवसेना शिंदे गटात जाणार असुन ते लवकरच निर्णय जाहीर करू शकतात. कार्यकर्ते यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी त्यांची भुमिका स्पष्ट केली. निर्णय झाला, घोषणा बाकी असुन ‘खिचके के ताण धनुष्यबाण’ अशी स्तिथी आहे. ओमराजे यांनी कार्यकर्ते यांना तयारीला लागा असे आदेश ओमराजे यांनी दिले असुन कार्यकर्ते यांना पाठीशी उभे राहत साथ द्या अशी विनंती केली. डॉ पाटील परिवाराची सत्ता, विकास कामे ही कारणे आहेत. स्थानिक स्वराज संस्था निवडणुका लढवल्या मात्र त्यात यश आले नाही, सत्तेची व आर्थिक ताकत ही त्यांच्या सोबत आहे. आपण ज्यांना विरोध करण्यासाठी राजकारणात आलो ते काँग्रेस सरकार असताना तिथे होते, भाजप सरकार आले की तिथे त्याच चालूच आहे. आपण कमी संसाधनात कुठे पर्यंत लढायचे. आपण सुद्धा त्याच पद्धतीने मार्गक्रमन केले पाहिजे असे मला प्रामाणिकपणे वाटते. बऱ्याच कार्यकर्ते सोबत माझी याची चर्चा झाली.
शेतकरी याचा साधा ट्रान्सफर दुरुस्त करायचा असेल तर निधी नाही, दर वर्षी इस्टीमेट तयार करायचे व निधी नाही. पाटील परिवार सत्तेत आहे, स्वतः आमदार, पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे. आणि आपण वेड्यासारखं बघत राहायचे आपण सुद्धा सत्तेतील नेतृत्व स्वीकारले पाहिजे. भाजप शिवसेना सह 4 पक्ष चालवत आहेत, या सगळ्या बाबीचा विचार करावा लागेल. कार्यकर्ते यांची बिले अडवली जात आहे.
20 वर्षनंतर कोणच आरोपी नाही, सगळेच निर्दोष आहेत, कोर्ट म्हणत आहे की राजकीय शत्रूत्व आहे उद्देश आहे पण सगळे निर्दोष. मी स्वतः खासदार असताना मी माझ्या कुटुंबाला न्याय देऊ शकत नाही तर इतरांचे काय ? प्रत्येक जण म्हणत आहे, तुमची प्रतिमा व महाराष्ट्रात नाव आहे. मी प्रतिमा सांभाळायला खासदार बनलो आहे का, या लोकांना धडा शिकवण्यासाठी झालो आहे. निकाल विरोधात गेल्यावर एकनाथ शिंदे हे तात्काळ गृहमंत्री यांना बोलले, मला पाठबळ दिले. निकाल लावायसाठी गेलो नाही.
साध्या साध्या गोष्टी होत नाहीत, मी जो निर्णय घेईल त्याच्या पाठीशी राहा, तुमची त्यासाठी नितांत गरज आहे अशी विनंती केली. जिल्हा परिषद, नगर परिषद सारखे लोकसभा व विधानसभावेळी झाले तर त्यांचीच सत्ता येईल. अनेक जण म्हणतात की मी त्यांच्या मांडीला मांडी लावुन बसणार का ? मी मांडीला मांडी नाही तर त्यांच्या उरावर जाऊन बसणार आहे त्यासाठी निर्णय घेत आहे. माझी भुमिका तडजोडीची कधीही राहणार नाही, त्या कुटुंबाला मतदान करा असे मी म्हणणार नाही, त्यांच्यासाठी मत मागणार नाही.











