तुळजापुर येथून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दाखल केली उमेदवारी
तुळजापूर – समय सारथी
आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेऊन तुळजापूर विधानसभा मतदार संघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी नामनिर्देशन दाखल केले.
मागील 5 वर्षात केलेल्या सातत्यपूर्ण जनकल्याणाच्या कामाची दखल घेऊन भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा तुळजापूर मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे. कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता व संतश्रेष्ठ गोरोबा काकांच्या आशीर्वादाने, मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांच्या साथीने यंदाही विजय आपलाच होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
आमदार पाटील हे 2019 मध्ये 23 हजार 169 मतांनी विजयी झाले होते, त्यांनी सलग 4 वेळेस विजय मिळवलेले काँग्रेसचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा पराभव केला होता. आमदार राणा यांना 99 हजार 34 तर मधुकरराव चव्हाण यांना 75 हजार 865 मते पडली होती, त्यावेळी 2 लाख 26 हजार 890 मतदार यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.