नेतृत्व निकालाच्या धास्तीत तर नगरसेवक आनंदाच्या मस्तीत
धाराशिव – समय सारथी
जनता रस्ते, पाणी, स्वच्छता यासह अन्य समस्यांनी त्रस्त असताना दुसरीकडे धाराशिव व तुळजापूर येथील काही नगरसेवकांनी ‘राणा दादा’ या प्रचार गितासह अन्य फिल्मी गाण्यावर स्विमिंग पुलमध्ये ठेका धरला व शिट्या वाजवल्या. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला. हे नगरसेवक विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने खास दिमतीत सहलीवर आहेत, नगरसेवकांच्या या वागण्यावर टीका होत आहे.
कै पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या निकालाची 16 जुन तारीख होती, त्यासाठी डॉ पद्मसिंह पाटील हे ऍम्ब्युलन्समध्ये व्हील चेअरवर बसून कोर्टात दाखल झाले तर दुसरीकडे काही नगरसेवक स्विमिंग पुलमध्ये ठेका धरत आनंद साजरा करताना दिसले, कार्यकर्त्यांचे हे विरोधाभासी वागणे राजकीय वर्तुळात दिवसभर चर्चेचा विषय ठरले. नेतृत्व निकालाच्या धास्तीत तर नगरसेवक आनंदाच्या मस्तीत, शिट्या वाजवीत भानावर नव्हते अशीही चर्चा रंगली.
जनता समस्यांनी त्रस्त असताना नेतृत्व डॉ पाटील व्हील चेअरवर कोर्टात संकटात असताना राणा ‘दादा’ प्रचार गीत, ‘निशाणा चुकला ना’ गाण्यावर धाराशिव व तुळजापूर येथील नगरसेवकांचा स्विमिंग पुलमध्ये ठेका ठरला, त्यांना काही देणे घेणे नाही, जनतेचे सोडा किमान नेतृत्वाचा व सध्य स्तिथीचा विचार करा अशी प्रतिक्रिया उमटली.












