आले किती, गेले किती.. संपले भरारा, तुझ्या परी नामाचा आजही दरारा.. लोकनेते आमदार सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव शहरात बॅनर झळकु लागले आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात एक आगळी वेगळी छाप टाकणारा हा नेता धाराशिव शहरात या लागलेल्या बॅनरने चर्चेला उधाण आले आहे. धाराशिव नगर पालिकेचे विविध घोटाळे आ सुरेश धस यांनी बाहेर काढलेले आहेत त्यांच्या नावाचा आजही दरारा आहे.
सततच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळवण्यासाठी प्रयत्न करणारे..” भगीरथ..”. आ. सुरेश धस. म्हणून ओळखले जातात.महाराष्ट्राचे राजकारणात सक्रिय असणारी मंडळी भरपूर आहे मात्र मतदारसंघात पायाभूत सुविधा, सहकार,आणि कृषी विकासात योगदान देणारे, शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी जिव्हाळा असणारे,ऊस तोडणी कामगारांविषयी ममत्व असणारे,दूध उत्पादक शेतकऱ्या विषयी सजग असणारे,सतत दूरदर्शीपणाने मतदारसंघातील जनतेची काळजी घेणारे. एक आगळे वेगळे व्यक्तिमत्व म्हणून आ.सुरेश धस यांची ख्याती आहे.
विद्यार्थी दशेमध्ये असतानाच अनेकांची वेगवेगळी ध्येय असतात कोणी डॉक्टर कोणी वकील कोणी इंजिनियर होण्याचे स्वप्न राशी बाळगून महाविद्यालयीन जीवनामध्ये वावरत असतात मात्र चाकोरी बदलून रस्ता सोडून कला, सांस्कृतिक, या बरोबरच विद्यार्थ्यांच्या चळवळी मध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांमधूनच नेते घडत असतात.त्या मालिकेतीलच एक नाव म्हणजे आ.सुरेश धस ग्रामीण भागातील गाव पातळीवरील सर्व प्रश्नांची जाणीव त्यांना आहे.
विद्यार्थी दशेतच, नेतृत्वाची जाणीव झाल्यामुळे नेता घडण्यासारख्या सर्वच गोष्टी निसर्गत सुरेश धस यांच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर घडल्याचे दिसते. विद्यार्थी संसद सचिव, सरपंच, तालुका दूध संघाचे संचालक, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष… त्यानंतर विधानसभा सदस्य, राज्य सहकारी दूध महासंघ महानंद मुंबई या राज्य पातळीवरील संस्थेचे अध्यक्ष.. त्यानंतर राज्यमंत्रीपद असा हा राजकीय प्रवास आपल्या झंजावाती कर्तृत्वाने राज्यभरात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे.
अभियांत्रिकीची पदवी घेतली असल्याने तांत्रिक माहिती घेत असताना त्यांना अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाची गरज पडत नाही त्यामुळे शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना अधिकारी वर्गावर आ. सुरेश धस यांची जबरदस्त पकड आहे. सुरेश धस यांच्या विकास कार्याचा आढावा शब्द मर्यादित बसवणे अशक्य आहे तरीही त्यांनी केलेल्या काही विकास कामांचा उल्लेख करणे क्रम प्राप्त आहे.
विधानसभा सदस्यत्वाच्या पहिल्याच कार्यकाळामध्ये त्यांनी केंद्र शासनाच्या स्वजलधारा या योजने अंतर्गत विक्रमी संख्येने पाणीपुरवठा योजना मंजूर करून देशात प्रथम क्रमांक पटकावला होता सन २००२ मध्ये प्रचंड प्रमाणावर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांची ६५ हजार जनावरांची एकाच ठिकाणी चारा आणि पाण्याची व्यवस्था करून चारा छावणी चालवून महाराष्ट्र राज्यात लौकिक मिळवला होता.
केंद्र शासनाच्या जुन्या तलावातील गाळ काढण्याची ४० कोटी रुपयांची योजना अत्यंत प्रभावीपणे राबवल्यामुळे आष्टी तालुक्यातील अनेक प्रकल्पांमधील गाळ काढण्यात आला आणि तो गाळ मुरमाड जमिनीवर पसरवण्यात आल्यामुळे अत्यंत सुपीक शेत जमीन तयार झाल्यामुळे अनेक गावांमधील शेतकऱ्यांना उत्पन्नामध्ये वाढ करण्याची संधी मिळाली त्याचबरोबर अनेक प्रकल्पांमधील पाणीसाठ्यामध्ये लक्षणीय वाढ झाली असा दुहेरी उपक्रम आ.सुरेश धस यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आला.
मूलतः अत्यंत धाडसी आणि सतत जनमानसात मिसळणारे व्यक्तिमत्व आणि जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा संच असल्यामुळे राजकारणातील कोणत्याही आव्हानांचा सामना करण्यास आ.सुरेश धस सतत तयार असतात त्यामुळेच सन २०१८ मध्ये उस्मानाबाद तथा लातूर/ बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ,उस्मानाबाद या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामीण विकास मंत्री पंकजा ताईसाहेब मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार या मतदारसंघात कधीही विजय झालेला नव्हता आणि हा विजय प्राप्त करावयाचा निग्रह ठेवूनच,सुरेश धस यांना भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली.या मतदारसंघांमध्ये विरोधी पक्षांची मतदार संख्या २०० हून अधिक असतानाही त्यांनी १०० हून अधिक मताधिक्याने या मतदारसंघात प्रथमतः भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्याचे ऐतिहासिक कार्य आमदार सुरेश धस यांनी करून दाखवले आहे.
भारतीय जनता पार्टीच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या कामाविषयी माहिती असलेल्या “सरल ॲप” नोंदणी मध्ये त्यांनी आष्टी विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आणल्यामुळे आ. सुरेश धस यांचे वर “सरल ॲप” चे महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.