धाराशिव – समय सारथी
धाराशिव लातुर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीची घोषणा झाली असुन या 3 जिल्ह्याच्या मतदार संघात 1051 मतदार असणार आहेत. धाराशिव, लातुर, बीड जिल्ह्यात 1 हजार 132 मतदार आहेत मात्र बीड जिल्हा परिषदेची निवडणुक न झाल्याने 1 हजार 51 मतदार असणार आहेत.
धाराशिव व लातुर या 2 जिल्हा परिषदेतून 114 जिल्हा परिषद सदस्य व 18 पंचायत समिती सभापती असे 132 मतदार असणार आहेत. लातुर महानगरपालिका 70, बीड, धाराशिव व लातुर या 3 जिल्ह्यातील 30 नगर परिषद व नगर पंचायत मधुन 776 निवडून आलेले व 73 प्राधिकृत केलेले असे 849 मतदार असणार आहेत. जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांनी तसा अहवाल पाठवला आहे.











