धाराशिव – समय सारथी
धाराशिव व अहिल्यानगर जिल्ह्यात ग्लोब फोर्ज लिमिटेड ही कंपनी 15 हजार 430 कोटी रुपयांची आर्थिक गुंतवणूक करणार असुन यातून 3 हजार 600 रोजगार निर्मिती होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळ उपसमितीने याला मान्यता दिली आहे, या प्रकल्पामुळे धाराशिव तालुक्यातील कौडगाव हे डिफेन्स हब बनणार असुन आर्थिक गुंतवणूक व रोजगार निर्मितीमुळे दरडोई उत्पन्न वाढणार असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, नगराध्यक्षा नेहा काकडे, उपाध्यक्ष अक्षय ढोबळे, नगरसेवक राहुल काकडे, माजी जि प अध्यक्ष नेताजी पाटील उपस्थितीत होते.
यापुर्वी काही प्रकल्प घोषणा झाल्या मात्र ते आले नाहीत याचेही तसे होणार का ? असा प्रश्न पत्रकार यांनी उपस्थितीत केल्यावर आमदार पाटील म्हणाले की आपल्याकडे काही जण झारीतील शुक्राचार्य आहेत, तसे होऊ शकते. आपल्याकडे गुंतवणूक येत आहे त्यांनी सकारात्मक घ्यावे असा टोला त्यांनी लागवला. त्यांच्या जवळचा तो शुक्राचार्य कोण ? पाटील हे राष्ट्रवादी पक्षातून भाजपमध्ये विकासाच्या मुद्यावर आले असुन त्यांच्या विकासाच्या ड्रीम प्रोजेक्टला खो कोण घालतो ? याची चर्चा यानिमित्ताने रंगली आहे.
श्रीगोंदा व कौडगाव येथे निबे ही कंपनी काम करणार असुन श्रीगोंदा येथे शेल तर कौडगाव येथे प्रॉपेलेंट व टीएनटी हे काम होणार आहे, यासाठी कौडगाव येथील 1 हजार एकर पैकी 800 एकर जमीन त्यांना सवलतीच्या दरात देणार आहे.
कौडगाव हे डिफेन्स हब बनणार असुन तिथे टप्याटप्याने 5 हजार एकर जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. यात केमिकल व मेकानिकल इंजिनिअर असे 2 हजार इंजिनियर लागणार असुन त्या व्यतिरिक्त 1 हजार लोकांना असा अंदाजे 3 हजार लोकांना पाहिल्या टप्प्यात रोजगार मिळणार असुन सुरुवातीला 2 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. निबे कंपनीच्या शिर्डी येथील प्रकल्पाचे मे महिन्यात राजनाथ सिंग यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.
चाकण येथे निबे कंपनीच्या प्रकल्पाचे उदघाटन झाले तिथे त्यांची भेट त्यावेळी त्यांना धाराशिव येथे गुंतवणूक करण्याचे निमंत्रण दिले. निबे हे तुळजाभवानी मातेचे निस्सीम भक्त आहेत त्यामुळे त्यांनी गुंतवणूक करायची तयारी दर्शवली तेव्हा पासुन पाठपुरावा सुरु होता. दर डोई उत्पन्न वाढण्यासाठी या प्रकल्पचा फायदा होणार असुन चालना मिळणार आहे. काही जण झारीतले शुक्राचार्य आहेत त्यामुळे अडथळा येऊ शकतो त्यामुळे याला सकारात्मक घ्यावे असे आवाहन आमदार पाटील यांनी केले.
टेक्निकल टेक्सईल पार्क सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु असुन संजय सावकारे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आहे. टेक्निकल काम हे कौडगाव, वडगाव व तारा इथे करण्यात येईल. कौडगाव येथे कॉम्प्रेस गॅस व सीबीजी युनिटसाठी सुद्धा ते प्रयत्न करणार असुन टप्प्याने 8 तालुक्यात हे सुरु करणार आहेत. डिफेन्स हबला 1 हजार एकर जागा पुरेशी नाही. मी उद्योग मंत्री असताना 10 हजार एकर जमीन संपादन करायचे आहे असे त्यावेळी सांगितले होते आता तिथे जमीन संपादन करणार आहोत. 1 हजार एकरला लागून 4 हजार एकर पडीक जमीन भुसंपादन करायच्या सुचना देण्यात आल्या आहेत.











