धाराशिव – समय सारथी
प्रत्येक गावात जशी मंदिरे असतात तशी उस्मानाबाद कळंब मतदार संघातील सर्व गावात अभ्यासिका सुरु करुन त्यासाठी एक वर्गखोली बांधण्याचा संकल्प आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीकडुन शिवसेना उबाठा पक्षाकडुन आमदार कैलास पाटील हे उभे आहेत त्यांनी माळकरंजा येथील भाषणात अभ्यासिका सुरु करण्याची संकल्पना मांडली. आगामी काळात शिक्षणाला प्राधान्य देण्यात येणार असुन गावात त्यासाठी एक वर्ग खोली बांधण्यात येणार आहे. या अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षा व इतर परिक्षाची तयारी करता यावी यासाठी लागणारी महत्वाची पुस्तके, विविध ग्रंथ, साहित्य अशी संपदा असणार आहे. लहान मुलापासुन ज्येष्ठ नागरिक यांना लागणारी पुस्तके, धार्मिक ग्रंथ असणार असुन आगामी 5 वर्षात टप्याटप्याने कामे करण्यात येणार आहेत. अभ्यासिकेतील ज्ञानभांडारमुळे गावात अनेक पुस्तके मिळणार आहेत.