धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे 14 जानेवारी रोजी रविवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन ते दुपारी 1 वाजता महायुतीच्या मेळाव्यास संबोधन करणार आहेत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यासह घटक पक्षाचा रविवारी मेळावा असुन त्याला त्यास आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थितीत राहणार आहेत.
धाराशिव शहरातील स्वस्तिक मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. पालकमंत्री प्राडॉ तानाजीराव सावंत यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने महायुतीने लोकसभेची तयारी सुरु केली आहे.
पालकमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत 14 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पुणे येथुन धाराशिव येथे येणार असून दुपारी 1 वाजता स्वस्तिक मंगल कार्यालय कॉम्प्लेक्स येथील महायुतीच्या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर दुपारी 3 वाजता धाराशिव येथून पुणे येथे रवाना होणार आहेत