धाराशिव – समय सारथी
धाराशिवमध्ये पालकमंत्र्यांच्या हस्ते होत असलेल्या ध्वजारोहण कार्यक्रमात भाषणावेळी 3 आक्रमक आंदोलने झाली, त्यावर पालकमंत्री सरनाईक यांनी हे पोलिस विभागाचे अपयश असल्याच्या शब्दा नाराजी व्यक्त केली. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांना त्यांनी तात्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असुन या घटनेची मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे ते म्हणाले.
आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय लागू करावा या मागणीसाठी धाराशिव मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झेंडावंदन सुरू असतानाच अभिजीत देडे या तरुणांना अंगावर डिझेल ओतून पेटून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बापु साळुंके यांनी सुद्धा गनिमी कावा पद्धतीने आंदोलन केले.
झेंडावंदनाचा कार्यक्रम सुरू असताना तगडा पोलीस बंदोबस्त लावलेला असताना देखील हा तरुण डिझेलचे कॅन हातात घेऊन अंगावर डिझेल ओतून घेत अचानक जोरदार घोषणाबाजी केली.या आंदोलनामुळे पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली पोलिसांनी तात्काळ या तरुणाला ताब्यात घेतले आहे.
केंद्र सरकारने अबकड या आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय घेतलाय मात्र राज्य सरकार तो निर्णय लागू करत नसल्याने आमच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे हा निर्णय लागू करावा अशी मागणी या तरुणांना केली आहे.











