जिल्हा परिषदेला भेट व कार्यशाळा – अध्यक्षा अर्चना पाटील यांनी मांडला विकासाचा रोड मॅप
धाराशिव – समय सारथी
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे 27 जुलै रोजी सोमवारी धाराशिव येथे येणार असुन त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030’ हे घोषवाक्य/टॅग लाईन घेऊन अनेक योजना व संकल्पना मांडल्या. ‘आपला जीव धाराशिव’ यावर आधारित थीम सॉंग/गाणे सुद्धा बनविले असुन त्यासह अन्य योजनेचे उदघाटन व लोकार्पण केले जाणार आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन इमारत, शासकीय अधिकारी, सभापती व सदस्य यांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असुन 240 कोटींचा डीपीआर सरकारकडे सादर केला आहे. नमो अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे.
मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना व जिल्हा परिषदेची माहिती घेणे, 710 गावे ग्रामसमृद्ध योजनेत सहभागी होणार आहेत. शालेय विद्यार्थ्यांना रात्री 7 ते 9 मोबाईल व टीव्ही वापर बंद करण्यासाठी भोंगा लावण्यात येणार आहे. हे 2 मुख्य कार्यक्रम असतील. शिक्षक, अधिकारी व इतराना एक गाव दत्तक दिले जाणार आहे. शाळा एकत्रिकरण केले जाणार असुन शाळेत सीसीटीव्ही बसवली जाणार असुन किमान 5 तरी सीसीटीव्ही बसवल्या जाणार आहेत. आशा व अंगणवाडी सेविकांना मोबाईल, इलेकट्रिक गाडी दिला जाणार आहेत.
प्लास्टिक बंदी व चहाचे कप बंद असतील जे वापरणार त्यांना 1 हजार व त्या ग्रामपंचायतील 10 हजार दंड लावणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात येणार आहे, वृक्ष लागवड बरोबरच वृक्ष तोडीचे प्रमाण कमी करण्यासाठी 110 गावांना विद्युत शवदाहिनी देण्यात येणार असुन ती सौर ऊर्जेवर चालणार आहे. नावीन्य पुर्ण व सेस फंड वापरला जाणार आहे. जनसुविधेसाठी आलेल्या 42 कोटींचे नियोजन सुरु असल्याचे त्या म्हणाल्या.
इलेक्ट्रिक घंटागाडीचे नियोजन असुन त्यासाठी 770 गाड्या लागणार आहेत. 83 अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन त्यात संगणक, पुस्तके, वायफाय व इतर सुविधा असणार आहेत. 5 वी ते 7 वी पर्यंत मुलींच्या शाळेत स्वच्छता गृह असणार आहे, 140 टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडण्यात येणार आहे, जे कोणी याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचा 16 वित्त आयोग पैसे निधी दिली जाणार नाही अशी तंबी दिली.
प्रत्येक गावात एक बाग करण्यात येणार असुन खुली व बांधिस्त जीम व्यायामशाळा सुरु करण्यात येणार आहे. अंगणवाडीमध्ये टीव्ही व सोलर बसवले जाईल व जुन्या ठिकाणी पण बसविले जाणार आहेत. महिलांना अंगणवाडी येथे पोषण आहार देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने त्यांना दिल्या जाणाऱ्या निधीतून 1 सफाई कर्मचारी लावायचा असुन स्वच्छता व अभियासिका याची देखरेख करायची आहे.
अभ्यास सोबत एक कला यावी यासाठी प्रोत्साहन देणे, शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शेतात नेहून काम करणे, पेरणी असे शिकवले जाणार आहे. जनावरासाठी पाणवठे सुरु केले जाणार आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. डिसेंबरमध्ये बाल साहित्य संमेलन केले जाणार असुन त्यासाठी 50 लाखांचा निधी ठेवला आहे.
जलजीवन मिशन योजनेत नळाला पाणी आले पाहिजे, तरच बील अदा केले जाईल, त्यासाठी अनेक बदल केले जाणार आहेत, असे त्या म्हणाल्या. वृक्ष लागवडची जबाबदारी ग्रामपंचायतला देण्यात येणार असुन मेरी पंचायत ऍपवर ते ऍड करून संगोपन सुद्धा केले जाणार आहे. जे वृक्ष संगोपन करणार नाहीत त्यांना निधी दिला जाणार नाही., अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तुकाराम भालके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. रविंद्र खंदारे यासह अधिकारी व विभाग प्रमुख कार्यरत आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा महाडदळकर, जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तुकाराम भालके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गिरी, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. रविंद्र खंदारे यासह अधिकारी व विभाग प्रमुख कार्यरत आहेत.












