भुम – समय सारथी
मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी केल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे नाव धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील अंतरगाव येथील चौकाला देण्यात आले.
सकल मराठा समाजाच्या वतीने गावातील मुख्य चौकाला मनोज दादा जरांगे पाटील चौक असे नाव देण्यात आले. गावातील लिंबराज महादेव गोरे यांनी मराठा आरक्षण मिळण्यासाठी सहा दिवस आमरण उपोषण केले होते त्यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज बांधव उपस्थितीत होते. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी करीत छत्रपती शिवाजी महाराज यांची पुजा करण्यात आली.