धाराशिव – समय सारथी
भाजपात सध्या नव्या व जुना कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यात आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बाबतीत कमालीची नाराजी दिसत आहे. काळे यांना दिलेली अपमानस्पद वागणूक ही असंतोषाचे कारण, निमित्त बनली असुन पक्षातील अनेकांनी उघडपणे खदखद व्यक्त केली आहे. पक्षातील तिकीट कापणे, काहीना प्रवाह व निर्णय प्रक्रियेबाहेर ठेवणे, समर्थकांना लाभाची व पक्षीय पदे देणे अशी अनेक कारणे आहेत.
अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर मल्हार पाटील यांनी सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केला असुन “काही नाती शब्दांपेक्षा भावनांनी जुळलेली असतात” असे म्हण्टले आहे. यापुर्वी देखील दुरावा, नाराजी, मतभेद निर्माण झाल्यावर मल्हार पाटील यांनी समनव्याची भुमिका बजावली होती, यावेळीही ते यातील दुवा ठरणार असल्याचे दिसते. काही नेत्यांना आमदार पाटील यांच्या पेक्षा मल्हार यांचा स्वभाव, कार्यपद्धती आपुलकीची व जवळची आणि सरस वाटते.
मल्हार पाटील यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये पालकमंत्री सरनाईक,माजी आमदार सुजितसिंह ठाकूर, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगराध्यक्ष विनोद गंगणे, नितीन काळे,अनिल काळे, धनंजय सावंत, सुनील मालक चव्हाण, रणवीर राऊत, शरण पाटील यासह पदाधिकारी आहेत. व्हिडिओ जुन्या आठवणी व स्नेहाला उजाळा दिला आहे. या व्हिडिओ नंतर मनधरणी व दुरावा दूर होतो का हे पाहावे लागेल.
“Makane X Koodappirannor” हे गाणे मल्याळम भाषेतील असुन भावनिक आहे. गाणे कौटुंबिक नात्यावर आधारित असुन लोकप्रिय झाले आहे. “एकमेकांवर रुसून दूर जाऊ नको. माझ्या नजरेआड होऊ नको. या जगात आपले म्हणून फक्त आपणच आहोत, आपण एकाच घरातील असुन नात्याने जोडलेले आहोत, मतभेद असू शकतात मात्र नातं तुटू शकत नाही, आपण एकमेकांचा आधार आहोत अश्या स्वरुपाचा त्यांचा आशय आहे. या भावनिक सादेला व्हिडीओमधील नेते कसा प्रतिसाद देतात हे पाहावे लागेल.











