धाराशिव – समय सारथी
कळंब ड्रग्ज तस्करीत पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील वडगाव येथील अक्षय रिटे या आरोपीला अटक केली असुन त्याला कोर्टाने सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, गुन्ह्याच्या तपासात आणखी एक आरोपी निष्पन्न झाला असुन आरोपीची संख्या 5 वर गेली आहे. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत.
निखिल युवराज जाधव व अरविंद दादाराव कांबळे या 2 आरोपीची न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे तर लखन गायकवाड हा पोलीस कोठडीत असुन आज 14 ऑगस्ट रोजी त्याला कोर्टात हजर केले जाणार आहे. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या असुन आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था.गु.शा. धाराशिव , सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली आहे.












