चंद्रपूर – समय सारथी
अयोध्येत होणाऱ्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रविणसिंह प्रतापसिंग परदेशी यांनी जटायु संवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून चंद्रपूरच्या ताडोबा जंगलात 10 जटायूंना संवर्धनासाठी निसर्गमुक्त केले आहे.
जटायूचा उल्लेख हा रामायणात येतो मात्र जटायुंची संख्या कमी होत आहे. त्यासाठी राज्य वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी व सफलतेसाठी प्रवीणसिंह प्रतापसिंग परदेशी यांनी महत्त्वाचे योगदान दिले.