धाराशिव – समय सारथी
कळंब ड्रग्ज तस्करीत अक्षय रिटे या आरोपीला 20 ऑगस्ट पर्यंत वाढीव पोलिस कोठडी मिळाली असुन लखन गायकवाड याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने धाराशिव येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान आणखी 1 आरोपी निष्पन्न झाला असुन त्याला अटक करण्यासाठी टीम रवाना करण्यात आली आहे.
कळंब ड्रग्ज तस्करी गुन्ह्यातील आरोपीची संख्या 5 वर गेली आहे. धाराशिव पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शकील शेख हे तपास करीत आहेत. 11 ग्राम ड्रग्ज हे कमर्शीयल (व्यवसायीक) क्षमतेचे असल्याने सर्व आरोपी समोरील अडचणी वाढल्या आहेत. व्यवसायीक क्षमता असल्याने जामिनसह कायदेशीर अडचणी वाढणार आहेत.
निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे व लखन गायकवाड हे 3 आरोपी जेलमध्ये आहेत. बँक खाती, आर्थिक व्यवहार, सीडीआर व इतर पुराव्याच्या आधारे पोलिस तपास करीत असुन लवकरच काही धक्कादायक बाबी समोर येणार आहेत.
धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठी कारवाई करीत 2 आरोपीना 4 ऑगस्ट रोजी अटक केली आहे. 11.21 ग्रामच्या वजनाच्या 29 पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या असुन आरोपीना रंगेहात पकडले. 55 हजाराचे ड्रग्ज व दुचाकी असा 1 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव, सपोनि खटके स्था.गु.शा. धाराशिव , सपोनि मगर पो.स्टे कळंब , पोहेकॉ राठोड पोहेकॉ जानराव , पोहेकाॉ गादेकर,पोहेकॉ जाधवर पोहेकॉ चौरे, पोना जाधवर पोना ढगारे, पोअं मुंगळे , पोहेकॉ शेख पोस्टे कळंब , पोहेकॉ माळवे पोस्टे कळंब,पोअं बोईनवाड , पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांनी कामगिरी केली आहे.









