धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व त्यांचा चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाच्या गुन्ह्यातून डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींची कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. डॉ पाटील यांच्या समर्थक व प्रेमी यांच्याकडुन सत्यमेव जयते… साहेब अशी मोहीम राबवली जात आहे. डॉ पाटील यांचा फोटो व सत्यमेव जयते असे लिहलेले पोस्टर घरावर चितकवले जात आहे.
डॉ पाटील यांना या हत्याकांडात राजकीय स्वार्थापोटी गोवले असल्याचा दावा समर्थकांनी केला आहे. तब्बल 17 वर्षाच्या संघर्षानंतर डॉ पाटील यांना न्याय मिळाला, सत्याचा विजय झाला अशी या मागील भावना आहे. हा निकाल रुपी विजय केवळ या डॉ पद्मसिंह पाटील यांचा नाही हा सत्याचा, न्यायाचा आणि पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या तमाम जनतेच्या विश्वासाचा आहे असे मल्हार पाटील यांनी भावना व्यक्त केली होती.
1990 मध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदासाठीही त्यांचं नाव चर्चेत होतं. नंतरच्या काळात खासदार म्हणून निवडून आल्यानंतर देशाच्या राजकारणात मोठी जबाबदारी आणि कॅबिनेट विस्तारात संधी मिळण्याची शक्यता होती. पण याच काळात त्यांची घौडदौड रोखण्यासाठी त्यांच्या राजकीय प्रवासात जाणूनबुजून निराधार आरोपांनी मोठा अडथळा उभा केला गेला असे मल्हार पाटील म्हणाले.
हत्याकांड विषयाशी काही संबंध नसताना राजकीय षडयंत्र रचण्यात आले, टप्या टप्याने काही गोष्टी समोर येतील. ही स्तिथी कशामुळे उद्भवली, हे षडयंत्र कोण व का केले, यात कोण कोण प्यादे होते. षडयंत्रकारी कोण याबाबत नंतर बोलेन, अतिशय चुकीची धाधंत विधाने केली जात होती. योग्य वेळी गरजेनुसार याबाबत बोलेन असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील निकालाच्या नंतर म्हणाले होते.
2006 साली दुर्दैवी हत्या झाल्यावर दुसऱ्या महिन्यापासून राजकारण केले गेले, या दुर्दैवी घटनेचा वापर राजकारणासाठी करण्यात आला. कोणाच्या सांगण्यावरून केले गेले परंतु काही जन सांगण्याला बळी पडले, दुर्दैवी घटनेचा पुरेपूर राजकीय वापर झाला. षडयंत्र कोणी, कधी, कसं व कशासाठी रचले याची बऱ्यापैकी माहिती मला आहे मात्र ते कधी सांगायचं आणि पर्याप्त पुरावे उपलब्ध करून दयायचे हे मी ठरवेल असे आमदार पाटील म्हणाले.












