धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथे जय भवानी हिंदु संमेलन समिती, धाराशिव यांच्या वतीने 30 एप्रिल रोजी विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 30 एप्रिल रोजी सायंकाळी 6.30 वाजता काळा राम मारुती मंदीर शेजारील मैदान, सबस्टेशन समोर, सांजा रोड येथे हे संमेलन होणार आहे. या संमेलनात प्रमुख वक्ते राजेश अंबादास संन्यासी (सामाजिक कार्यकर्ता), मातृशक्ती प्रबोधन हर्षताई ठाकूर (हिंदुत्ववादी व्याख्याता), आशिर्वचन हभप ज्ञानेश्वर माऊली महाराज एकंबीकर, मेडसिंगा (संस्थापक अध्यक्ष समर्थ रावसाहेब बाबा पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडसिंगा) हे मार्गदर्शन करणार आहेत.
हिंदु सारा एक मंत्र हा दाही दिशांना घुमवु या । धरती नभ पाताळ ही भारू प्राण पणाला लावू या.. या उक्ती प्रमाणे गेल्या अनेक वर्षा पासून आपल्या समाजाने आचरण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच आज हिंदुत्वाला जीवनाच्या विविध क्षेत्रात आलेले यश आपण पाहात आहोत, परंतु हिंदुत्वाचा हाच विचार, हेच यश आगामी काळात आपल्या गावात आपल्या वस्तीत दिसण्यासाठी स्थानिक पातळीवर आपण सर्वांनी हिंदू म्हणून एक येण्याची आवश्यकता आहे, या एकत्रीकरणातून आपले गाव, आपले प्रश्न सोडवण्याची ऊर्जा, शक्ती आपणास प्राप्त झाली पाहिजे. हा उद्देश ठेवून हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हिंदु संमेलनच का ? छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यासाठी, हिंदु संघटित तरच राष्ट्र सुरक्षित. हिंदु संघटित तरच संविधान सुरक्षित. जिथे हिंदूंची संख्या कमी झाली तो भाग भारतापासून तोडला गेला. हिंदूंमध्ये जातीय द्वेष पसरवण्यासाठी देशविरोधी शक्ती सक्रिय; त्यासाठी हिंदू एकता हेच उत्तर. जातीपाती विसरुया, हिंदू म्हणून एक होऊया असा हेतू आहे. संमेलनास जास्तीत जास्त हिंदु बांधवांनी सह कुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.










