धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या अतिक्रमण विरोधी विभागाने जप्त केलेल्या बॅनरच्या लोखंडी फ्रेम कोणताही दंड न आकारता किंवा प्रक्रिया पार न पाडता परत देण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे, सुट्टीच्या दिवशी काही जण अंधारात ह्या फ्रेम घेऊन जात असल्याचे लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. एक प्रकारे फ्रेमची ही चोरीचं असुन कोणाच्या आशिर्वादामुळे हे घडले याची चर्चा होत आहे.
सुट्टीच्या दिवशी नगर परिषद कार्यालयाच्या परिसरातील 20 ते 25 फ्रेम कोणताही अर्ज, प्रक्रिया व दंड न घेता सन्मानाने परत देण्यात येत आहेत. रात्रीस खेळ चाले असा हा प्रकार आहे. सध्या नगर परिषदेचा कारभार हा तोंडी आदेशाने सुरु आहे. ह्या फ्रेम ज्या अधिकारी कर्मचारी यांच्या ताब्यात होत्या तेही दबावाखाली असल्याने हतबल झाले आहेत.












