धाराशिव – समय सारथी
एका विवाहित महिलेला खोटे नाव सांगून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवुन धमकी व बळजबरीने लग्न करून मुस्लिम धर्म स्वीकारायला लावला. नमाज व कलमा वाचून तिला धर्मातर करायला भाग पाडले, हातावर मुस्लिम धर्माचा टॅटू काढायला लावला, बैलाचे मटण खाऊ घातले तसेच तिला 2 ते 3 कला केंद्र येथे नेहून मारहाण करीत नाच काम करायला भाग पाडले. वारंवार होणाऱ्या अत्याचाराला कंटाळुन गुन्हा नोंद केल्याने वाचा फुटली आहे. धाराशिव, बीड, संभाजीनगर, वाशीम, नांदेड अश्या 5 जिल्ह्यात व 4 कला केंद्रावर केलेल्या अत्याचाराची व्याप्ती मोठी आहे.
एका महिलेने तक्रार दिली त्यानुसार तीचे लग्न असुन तिला 2 मुले झाली मात्र नवऱ्याशी तीचे सतत भांडण होत असल्याने ती आई वडिलांकडे राहायला आली, त्यानंतर ती आई वडील मुलासह 2023 मध्ये पुणे येथे कमवायला गेली, तिथे शिक्रापूर येथे एका कंपनीत काम करीत असताना मुस्कान या महिलेशी तिची ओळख झाली, 12 हजार पगारात तुझे कसे भागणार ? तू धाराशिव येथील गौरी कला केंद्र येथे चल, तिथे डान्स केला की भरपूर पैसे मिळतील असे सांगून नेले. तिथे अर्चना नावाच्या एका महिलेच्या पार्टीत तिला नाचायला लावले, तिथे 2 मुली पुर्वीच होत्या त्यांना सुद्धा मुस्कान हिने कला केंद्रात सोडले होते असे त्या मुलींनी सांगितले.
कला केंद्रात काम करीत असताना एका मुलाने बैठक लावली, त्याने राजू असे नाव सांगितले व तिच्याशी जवळीक व मैत्री केली, त्याने कला केंद्र येथे पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तो तिला चार आठ दिवसांनी बाहेर घेऊन जायचा. रूम व कळंब येथील प्रेरणा लॉज येथे तिला नेहून अनेक वेळा संबंध ठेवले. त्याने तीचे फोटो व व्हिडीओ काढुन ठेवले. त्या आधारे तो लग्नासाठी दबाव टाकायचा, दबावाखाली ती तयार झाली.
सर्फराज हा तिला वाशीम जिल्ह्यातील डिग्रस येथे एका मौलानाकडे घेऊन गेला, तेव्हा तिला तो मुस्लिम समाजाचा असल्याचे कळाले. तीने हिंदू धर्म बदलायला नकार दिल्यावर जीवे मारण्याची व फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. महिलेला बुरखा घालायला लावला, तिची टिकली काढुन टाकली. नमाज व कलमा वाचायला सांगितला, लग्न करण्यासाठी तीचे नाव ‘जोया’ ठेवुन धर्मातर केले. बळजबरीने तीच्या उजव्या हाताचे पोटरीवर गरीब नवाजचा टॅटू काढण्यास भाग पाडले व मारहाण, शिवीगाळ करुन मानसिक त्रास दिला.
महिला व सर्फराज बकरी ईद निमित्त कळंब येथे घरी आल्यावर तिथे त्याच्या 2 बायका व मुले होती. त्यानंतर विरोध केल्यावर त्याने जीवे मारण्याची धमकी दिली, तो मुलीला बुरखा घालुन बाहेर पाठवत असे, त्याबाबत विचारले असता त्याने सांगितले की, त्याला तडीपार केले असुन अनेक गुन्हे नोंद असल्याने तो बाहेर जात नाही. त्याने महिलेला बकऱ्याचे म्हणुन बैलाचे मटण बळजबरीने खाऊ घातले. तिला मारहाण व अनेक वेळा अत्याचार केले.
महिलेला घेऊन तो बीड जिल्ह्यातील मांजरसुंबा येथील जगदंबा या कला केंद्रामध्ये घेवुन गेला व तेथे पार्टी मालक बनला, तिथे मारहाण करून काम करायला लावले. मी मुली आणुन देतो त्याच्यापासुन धंदा करून घे असे म्हणत. तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र तिला परत पकडून आणले, ते कला केंद्र बंद पडल्यावर महाकाली कला केंद्र येथे घेऊन गेला व तिथे हिंदू नाव टाकून त्याने पार्टी सुरु केली. तिथून तीने पळ काढुन लातुर गाठले मात्र तीच्या मोबाईलमध्ये लोकेशन टाकल्याने त्याने तिला पकडले व मारहाण करून पुन्हा महाकाली कला केंद्रात आणले. तीचे तलवारीने हल्ला केला त्यात तिच्या मैत्रिणीला लागले.
थापीदंडा कला केंद्र, संभाजीनगर येथे तिला घेऊन गेला. तिथून 4 ते 5 मुलींना सोबत घेऊन मथुरा येथे नेले. तुझ्या मुलीला माझ्यासोबत झोपायला आणुन दे असे म्हणुन मारहाण करीत असे. संभाजीनगर पोलिसात तक्रार द्यायला गेल्यावर तो तिथे आला व अडवले. इतर मुलीचे पालक आल्याने ते त्यांना घेऊन गेले व पोलिसांनी त्याला सोडून दिले.महिला लोहा येथे घरी आल्यावर तिथे आई वडिलांना धमकी दिली. त्यानंतर मुलीने पुणे गाठले तिथेही त्रास दिला त्यानंतर तीने पोलिसात तक्रार देऊन गुन्हा नोंद केला.
भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 351(2),352,64, 64(2)(m) या कलमानुसार पुणे शहर अंतर्गत खडक पोलिस ठाण्यात झिरोने गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपासासाठी धाराशिव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. सर्फराज अलीम मोमीन असे आरोपीचे नाव असुन तो कळंब येथील रहिवाशी आहे, लव्ह जिहादचा हा प्रकार असुन आणखी कोणी पिडीत आहे का याचा शोध घेणे गरजेचे आहे. धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्र बंद झाली असली तरी तिथे नर्तिका असलेल्या महिलावर झालेल्या अत्याचाराची एक एक प्रकरणे बाहेर येत आहेत.












