धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचे 207 किलो सोने व 2 हजार 570 किलो चांदी वितळवण्याच्या परवानगीचा अर्ज छत्रपती संभाजीनगर उच्च न्यायालयाने फेटाळला असल्याची माहिती ऍड उमेश भडगावकर यांनी दिली. मंदीर संस्थानने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात जावे अशी सुचना न्यायालयाने दिली. न्यायाधीश मंगेश पाटील व शैलेश ब्रहमे यांनी याबाबतचे आदेश दिले. तुळजाभवानी मंदीर संस्थानने सोने चांदी वितळविण्यासाठी केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळत स्थगिती दिली आहे. विधी व न्याय विभागाने तुळजाभवानी मंदीर संस्थानला सोने चांदी वितळवायला परवानगी दिली आहे मात्र त्याला काही पुजारी व हिंदू जनजागरण समितीचा विरोध असुन त्यांनी कोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी याबाबत तक्रार देत सोने चांदी वीतळविण्यास विरोध करीत आंदोलन सुद्धा केले होते, त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
तब्बल 13 वर्षानंतर राबवली जाणार होती सोने वितळविणे प्रक्रिया मात्र आता त्याला स्थगिती दिली आहे. भक्तांनी 2009 पासून 207 किलो सोने आणि 2 हजार 570 किलो चांदी अर्पण केली आहे. 1 जानेवारी 2009 ते 10 जुन 2023 या दरम्यान जमा झालेल्या सोने चांदी वितळविनेस सरकारने अद्यादेश काढून परवानगी दिली होती मात्र कोर्टाने त्याला नकार दिला आहे.