धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 10 जानेवारी रोजी धाराशिव जिल्ह्यात येणार आहेत. पालकमंत्री तथा राज्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात धाराशिव जिल्ह्यात पदाधिकारी बैठक, भव्य अश्या सभेचे आयोजन करण्यात येणार आहे.शिवसेनेने धाराशिव लोकसभा मतदार संघावर दावा ठोकला आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री यांचा शिवसंकल्प अभियान दौरा असणार असुन शिवसेनेने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. राज्यातील 45 जागा जिंकण्याचा महायुतीचा संकल्प असुन त्यानुसार हा दौरा असणार आहे.