Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

पराभवाची भिती व सत्तेची लालसा, आत्मचिंतनाचा सल्ला – अस्तित्वासाठी भाजपात प्रवेश, जुन्या पदाधिकाऱ्यांचे प्रतीउत्तर

समय सारथी by समय सारथी
August 6, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
191
VIEWS

धाराशिव – समय सारथी

निष्ठावान म्हणता तर मागील 30 वर्षांमध्ये भाजपच्या पक्ष संघटन बांधणीसाठी किंवा पक्ष वाढीसाठी आपले काय योगदान आहे हे उदाहरणासह संदर्भ स्पष्टीकरण द्यावे असे आव्हान जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना ताई पाटील यांनी भाजपच्या जुन्या नेत्यांना केले होते. त्याला भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ऍड व्यंकट गुंड व विनोद गपाट यांनी प्रतीउत्तर दिले आहे. पाटील परिवार भाजपात नसतानाही जिल्ह्यात महायुतीचे खासदार, आमदार, जिल्हा परिषद व नगर सेवक होते असे गपाट म्हणाले तर पाटील पाटोदेकरसह गोरे यांचा भाजपच्या जुन्या सदस्यांनी पराभव केला असे गुंड म्हणाले.

शिवसेना भाजपा ही धाराशिव जिल्ह्यात पहिल्यापासून एक आहे. मागील 9 लोकसभा निवडणुकीपैकी 7 निवडणुका युतीने जिंकल्या. ज्यावेळी डॉ पाटील आणि मधुकरराव चव्हाण मंत्री होते त्यावेळी जिल्ह्यात 4 नगर परिषद, पंचायत समिती युतीने जिंकली होती, जिल्ह्यात युतीचे कायम 2-3 आमदार निवडून येतात. विजयाचे श्रेय कोणा एकाचे नाही तर युतीचे कार्यकर्ते आणि पक्षाचे आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवले पाहिजे असे विनोद गपाट म्हणाले. पंचायत समिती, नगर परिषद भाजप सेना युतीच्या ताब्यात होती, आणखी संदर्भ हवे असतील तर योग्य वेळी देऊ असे गपाट म्हणाले.

पराभवाची भिती व सत्तेची लालसा यातून पाटील परिवाराने भाजपात प्रवेश केला त्यामुळे त्यांनी जुन्या पदाधिकारी यांच्यावर टीका करण्यापेक्षा आत्मचिंतन करावे असा सल्ला ऍड गुंड यांनी दिला. राष्ट्रवादी व पाटील परिवाराची एकहाती सत्ता असताना त्यांचे नातेवाईक जीवनराव गोरे यांचा सुधाकर गुंड गुरुजी यांनी 1997 साली पराभव केला तर भाचे अमोल पाटोदेकर यांचा रामदास कोळगे यांनी 2012 साली पराभव केला. पाटील परिवार व राष्ट्रवादी सत्तेच्या सर्वोच्च शिखरावर असताना गुंड व कोळगे सारख्या सामान्य कार्यकर्ते यांनी पराभव केला त्यामुळे अतिआत्मविश्वास दाखवू नये असे गुंड म्हणाले.

डॉ पाटील यांची एकहाती सत्ता असताना तेर ग्रामपंचायतमध्ये 2 वेळेस पराभव झाला, अमर पाटील यांचा पराभव झाला त्याला जबाबदार कोण होते हेही सर्वाना माहिती आहे. सोईनुसार राजकीय श्रेय घेण्या ऐवजी पराभवाचे सुद्धा घ्या, प्रतिस्पर्धी निर्माण होऊ नये यासाठी जवळच्या, पक्षातील काही लोकांचा ठरवून पराभव केला हे सर्वश्रुत आहे त्यामुळे टिके पेक्षा चुका व वागणे सुधारा असे ऍड गुंड म्हणाले. 

लोकसभेला डॉ पाटील, त्यानंतर राणाजगजीतसिंह पाटील व नंतर अर्चना पाटील यांचा लाखोंच्या मतांनी पराभव  झाला. डॉ पाटील व राणाजगजीतसिंह यांनी राष्ट्रवादीकडुन निवडणुक लढविली त्यावेळी त्यांचा भाजप सेना युतीने पराभव केला. पती भाजपात असताना खासदारकी व सत्तेच्या लालसेपोटी अर्चना पाटील ह्यांनी राष्ट्रवादीतुन निवडणुक लढविली त्यातही त्यांचा पराभव झाला यावरून जनता त्यांना स्वीकारत नसल्याचे दिसते, भाजपमुळे हे निवडून आले व राजकारणात टिकून आहेत. जसे यशाचे श्रेय घेता तसे या पराभवाचे पण घ्या. वारंवार होणारे अपयश व पराभवाची भिती असल्याने राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी ते भाजपात आले हे सत्य सर्वासमोर मान्य करावे असे ऍड गुंड म्हणाले.

तेरणा कारखाना शेतकऱ्यांचा असताना तो बुडावला, तेरणा ट्रस्ट स्वतःच्या कुटुंबाच्या मालकीची केली, मेडिकल कॉलेज नेरुळला नेले, तिथे एक तरी मुलगा मोफत शिकवला का ? कारखाना उभा करायचा म्हणुन पैसे गोळा केले व फक्त चिमणी उभारली त्यांच्या मागून आम्ही 4-5 कारखाने उभे करून तरुणांना रोजगार दिले. यांनी उलट संस्था बुडीत काढून बंद पाडल्या व पैसे लुटले, नुसत्या पोकळ घोषणा केल्या, किती लोकांना रोजगार दिला. जुने भाजप कार्यकर्ते स्वाभिमानी आहेत, त्यांचे लाभार्थी नाहीत त्यामुळे त्यांना भीडभाड नाही. एक टेंडर त्यातून टक्केवारी हे धंदे आमचे नाहीत, आम्ही पक्ष शिस्त पाळली होती मात्र यांना संदर्भ हवे होते. आम्ही आमची बाजु पक्ष नेतृत्वाकडे मांडू असे ऍड गुंड म्हणाले.

Previous Post

‘भोंगा वाजला… टीव्ही-मोबाईल बंद’ – अभ्यासासाठी गावागावांत लोकचळवळ, उपक्रम राज्यासाठी आदर्श

Next Post

सरंजामी प्रभाव – त्याग, संघर्ष, समर्पण व अखंड निष्ठेवरचा वटवृक्ष, विकासाचा हिशोब जनतेसमोर मांडा

Related Posts

महाराष्ट्र

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026
महाराष्ट्र

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026
महाराष्ट्र

कुलूप – अग्नीतांडव नंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थान विभागाचे कार्यालय बंद, असंवेदनशिलता

November 10, 2026
महाराष्ट्र

हद्दपारी – रोचकरी पिता पुत्राचा प्रस्ताव, देवानंद यांच्यावर 37 तर गणेशवर 9 गंभीर गुन्ह्यांची नोंद 

November 8, 2026
महाराष्ट्र

ड्रग्ज तस्करी, रॅली काढणे भोवले – नगरसेवक मिर्झासह 40 जणांवर गुन्हा नोंद, तिघांवर 110 ची कारवाई

November 7, 2026
महाराष्ट्र

अमानुष मारहाण, प्रेमप्रकरणाचा संशय – एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी, तुळजापूर येथील घटना

November 4, 2026
Next Post

सरंजामी प्रभाव - त्याग, संघर्ष, समर्पण व अखंड निष्ठेवरचा वटवृक्ष, विकासाचा हिशोब जनतेसमोर मांडा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

हत्येचा कट ? सत्ता परिवर्तन, आमदार कैलास पाटीलांच्या जीवाला होता धोका, संजय शिरसाठांचा गोप्यस्फ़ोट

November 23, 2026

अहवाल सादर, कारवाईकडे लक्ष – नगर परिषद घोटाळा, यलगट्टेसह अन्य लोकांवर कारवाईची टांगती तलवार

November 16, 2026

कुलूप – अग्नीतांडव नंतर सुद्धा आपत्ती व्यवस्थान विभागाचे कार्यालय बंद, असंवेदनशिलता

November 10, 2026
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp