Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030′ हा मोहिमेचा शुभारंभ – अध्यक्षा अर्चना पाटीलांची संकल्पना

समय सारथी by समय सारथी
July 27, 2026
in महाराष्ट्र
0
0
SHARES
613
VIEWS

अध्यक्षाचा कार्यकाळ 5 वर्षाचा करा – अध्यक्ष व सदस्यांना काम व मानाप्रमाणे वेतन वाढवा

धाराशिव – समय सारथी

आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030′ हा मोहिमेचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पना व पुढाकारातून अनेक विकास कामे करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्षाचा कार्यकाळ हा अडीच ऐवजी सरपंच प्रमाणे 5 वर्षाचा करावा. अध्यक्ष व सदस्यांना काम व मानाप्रमाणे वेतन वाढवावे अशी मागणी अर्चना पाटील यांनी गोरे यांच्याकडे केली. 

‘आपला जीव धाराशिव’ या गाण्याचे लोकार्पण करण्यात आले, ही जिल्हा परिषद विकासाची टॅगलाईन असणार आहे. आरोग्य विभागात धाराशिव राज्यात प्रथम असुन शिक्षण विभागात प्रथम आणण्याचा संकल्प पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. कृषी विभाग अंतर्गत प्रत्येक गावात महिलांचे गट तयार करण्यात येणार असुन आशा वर्कर यांना इलेक्ट्रिक स्कुटी व 5 जी मोबाईल दिला जाणार आहे असे त्या म्हणाल्या. 

उदघाटना बरोबर काम करण्याची जबाबदारी असुन 2030 पर्यंत ही सगळी कामे पुर्ण केली जातील असे आश्वासन दिले. जिल्हा परिषदेची इमारत जीर्ण झाली असुन सभापती, सदस्य, अधिकारी व कर्मचारी निवासासाठी निधी द्यावा अशी मागणी केली. सरपंच 5 वर्षासाठी मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपद हे अडीच वर्षासाठी का ? असा सवाल करीत असा दुजाभाव करू नये अशी मागणी त्यांनी केली. अडीच वर्ष हे समजुन घेण्यासाठी व नवीन आलेल्या अध्यक्षला अडीच वर्ष काम करण्यासाठी लागतात. अनेक कामे, योजना अपुऱ्या राहतात. स्थानिक स्वराज संस्था बळकटीकरण करण्याचा अजेंडा सरकारचा आहे त्यामुळे 5 वर्ष मुदत करावी. जिल्हा परिषद अध्यक्ष, सदस्य यांना मानाप्रमाणे व कामाप्रमाणे वेतन मिळावे अशीही मागणी केली. 

2026 ते 2030 या काळात जिल्हा व जिल्हा परिषदेला व्हिजन असावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे त्या म्हणाल्या. उद्यापासून धाराशिव जिल्ह्यातील प्रत्येक गावातील टीव्ही, मोबाईल हे सायंकाळी 7 ते 9 बंद असतील, त्यासाठी शिक्षक, ग्रामपंचायत व जिल्हा परिषद अधिकारी यांना गावे दत्तक देण्यात आली असुन चांगला प्रतिसाद मिळत आहे. धाराशिव जिल्हा हा सगळ्यात अगोदर हागणदारी मुक्त झाला. वृक्षारोपणसोबतच संवर्धनावर सुद्धा भर दिला जाणार असुन 110 गावात सोलर उर्जेंवर चालणारे विद्युत शवदाहिनी देण्यात येणार आहे. 

प्रत्येक घरावर व शासकीय इमारतीवर सोलर बसविण्यात येणार आहे. वृक्ष लागवडची जबाबदारी ग्रामपंचायतला देण्यात येणार असुन मेरी पंचायत ऍपवर ते ऍड करून संगोपन सुद्धा केले जाणार आहे. जे वृक्ष संगोपन करणार नाहीत त्यांना निधी दिला जाणार नाही. प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात येणार आहे. कॅन्सर आजार होऊ नये यासाठी प्लास्टिक बंदी व चहाचे कप बंद असतील जे वापरणार त्यांना 1 हजार व त्या ग्रामपंचायतील 10 हजार दंड लावणार असल्याचे त्या म्हणाल्या. इलेक्ट्रिक घंटागाडीचे नियोजन असुन त्यासाठी 770 गाड्या घेणार असल्याचे त्या म्हणाल्या.

83 अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन त्याला नमो अर्थात नरेंद्र मोदी अभ्यासिका असे नाव दिले जाणार आहे. त्यात संगणक, पुस्तके, वायफाय व इतर सुविधा असणार आहेत. 5 वी ते 10 वी पर्यंत मुलींच्या शाळेत स्वच्छता गृह असणार आहे, 140 टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडण्यात येणार आहे. अभ्यास सोबत एक कला यावी यासाठी प्रोत्साहन देणे, शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शेतात नेहून काम करणे, पेरणी असे शिकवले जाणार आहे. जनावरासाठी पाणवठे सुरु केले जाणार आहेत, डिसेंबरमध्ये बाल साहित्य संमेलन केले जाणार असुन त्यासाठी 50 लाखांचा निधी ठेवला आहे.

यावेळी व्यासपीठावर आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, उपाध्यक्ष उषा रवींद्र गायकवाड, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा महाडदळकर, पोलिस अधीक्षक रितू खोखर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगराध्यक्ष नेहा काकडे, नितीन काळे, ऍड नितीन भोसले यासह जिल्हा परिषद सभापती, सदस्य उपस्थितीत होते. जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तुकाराम भालके, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 

Previous Post

शिवसेनेच्या कुबड्यावर सत्ता पण शिवसेनेच्याच नेतृत्वाचा अपमान – ऍड अजित खोत यांची टीका तर काही सदस्यांचा बहिष्कार

Next Post

पथदर्शी उपक्रम – राज्य पातळीवर दखल घेऊ, निधी कमी पडणार नाही – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केले अर्चना पाटीलांचे कौतुक 

Related Posts

महाराष्ट्र

‘दिवट्या आमदार’ तर ‘नासका आंबा’ – पाणी प्रश्नावरून राजकारण पेटले 

September 19, 2026
महाराष्ट्र

अजब कारभार – ना दिनांक, ना जावक क्रमांक, पंचायत समिती संरक्षण भिंतीचे काम, राजहट्ट

September 19, 2026
महाराष्ट्र

पंचायत समितीचे 3 प्रवेशद्वार बंद – रस्ते सुद्धा बंद करण्याचे नियोजन, रातोरात यंत्रणा

September 18, 2026
महाराष्ट्र

शासकीय नर्सिंग कॉलेजला मान्यता, 100 विद्यार्थी क्षमता – खासदार ओमराजेंनी मानले सरकारचे आभार

September 18, 2026
महाराष्ट्र

डान्स शिकविण्याचे बहाण्याने अत्याचार – आलम डान्स अकॅडमी, गुन्हा नोंद, तपास सुरु – लव्ह जिहादचा आरोप

September 18, 2026
महाराष्ट्र

आंदोलन तात्पुरते स्थगित, 90 दिवसांचा वेळ – मराठा आरक्षण मिळेपर्यंत लढा, मनोज जरांगेंची भुमिका

September 17, 2026
Next Post

पथदर्शी उपक्रम - राज्य पातळीवर दखल घेऊ, निधी कमी पडणार नाही - ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी केले अर्चना पाटीलांचे कौतुक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

‘दिवट्या आमदार’ तर ‘नासका आंबा’ – पाणी प्रश्नावरून राजकारण पेटले 

September 19, 2026

अजब कारभार – ना दिनांक, ना जावक क्रमांक, पंचायत समिती संरक्षण भिंतीचे काम, राजहट्ट

September 19, 2026

पंचायत समितीचे 3 प्रवेशद्वार बंद – रस्ते सुद्धा बंद करण्याचे नियोजन, रातोरात यंत्रणा

September 18, 2026
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp