धाराशिव – समय सारथी
आमचं ठरलंय.. असे म्हणत तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. नेमक काय ठरलंय हे गुलदस्त्यात असुन गंगणे यांचा फोन बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.
धाराशिव जिल्ह्यात सध्या विकासाच्या मुद्यावर पक्ष परिवर्तनाची लाट सुरु आहे. वैराग व कळंब नगर परिषद हे त्याचे उदाहरणं असुन अश्या राजकीय स्तिथीत गंगणे यांनी व्हिडिओ पोस्ट केल्याने अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. तुळजापूर नगर परिषदेतील काही नगरसेवक हे नाराज असल्याची मध्यंतरी चर्चा होती.
गंगणे हे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक असुन ते भाजपच्या तिकीटावर जनतेतून नगराध्यक्ष पदावर निवडून आले आहेत. तुळजापूर नगर परिषदेत सत्ता मिळविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असुन त्यांना नगरसेवक गटाचा एकमुखी पाठिंबा आहे, त्यामुळे त्यांचा शब्द व भुमिका ‘प्रमाण’ मानली जाते.










