संचालन समिती अंतर्गत सहकार क्षेत्र संपर्क समितीत समावेश
धाराशिव –
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार तयारी केली असून युवा नेते दत्ता भाऊ कुलकर्णी यांच्या सारख्या नव्या चेहऱ्यांना मोठी जबाबदारी दिली आहे. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन समिती मध्ये धाराशिव जिल्ह्यातून भाजपचे दत्ताभाऊ कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे. दत्ता कुलकर्णी यांना सहकार विभागाची जबाबदारी जबाबदारी देण्यात आली आहे. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांचा अध्यक्षतेखालील समितीत धाराशिव जिल्ह्यातून दत्ता कुलकर्णी यांच्या नावाचा समावेश आहे.
या समितीमध्ये विशेष आमंत्रित सदस्य म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, माजी मंत्री नारायण राणे, यांच्यासह राज्यातील मातब्बर नेते मंडळींचा समावेश आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी व्यूहरचना अखून काम करायचा आहे.
सहकार क्षेत्र संपर्क समितीमध्ये विधान परिषद गटनेते प्रवीण दरेकर, मराठवाड्यातून दत्ता कुलकर्णी, अशोकराव जगताप, उत्तर महाराष्ट्रातून रोहित निकम, केदा आहेर, मुंबई विभागातून नितीन बनकर तर विदर्भ मधून योगेश बन यांची निवड करण्यात आलेली आहे.
विश्वासातून प्रगतीकडे हे ब्रीद वाक्य घेऊन श्री सिध्दीविनायक परिवाराची उद्योग निष्ठा महाराष्ट्राला आदर्शवत अशी आहे.श्री सिध्दीविनायक दत्ता कुलकर्णी यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वात बँकिंग, गूळ कारखाना,सहकारी रुग्णालय, इन्शुरन्स तसेच शेती संबधित क्षेत्रात काम करीत यशाचे शिखर गाठत आहे.मागील दशकापासून ग्राहक, शेतकरी, सभासद, खातेदार, हितचिंतक यांच्या विश्वासास पात्र ठरला आहे.