धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते धाराशिव जिल्ह्यातील भवानी ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी धाराशिव जिल्ह्यातील भवानी ग्रुप चे संस्थापक लिंबराज डुकरे यांच्या नेतृत्वात शिवसेना पक्षात प्रवेश केला, यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी डुकरे यांच्या खांद्यावर भगवा देत शिवबंधन बांधले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
भवानी ग्रुपच्या जवळपास 100 ते 150 शाखा ह्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते शिवसेनेत विलीन झाल्या. शिवसेना पक्षांचे संघटक सुधीर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्षप्रवेश करण्यात आला. भवानी ग्रुप हा एक सामाजिक ग्रुप असुन विविध उपक्रम राबविले जातात शिवाय या ग्रुपमध्ये तरुणांचे मोठे संघटन जिल्ह्यात कार्यरत आहे. आगामी काळात शिवसेना पक्ष वाढीसाठी कार्यरत राहण्याचा संकल्प या ग्रुपने डुकरे यांच्या नेतृत्वात केला आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकत वाढली आहे.