तुळजापूर – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचा प्रस्तावित विकास आराखडा हा एकतर्फी होत असल्याचा आरोप करीत तुळजाभवानी पुजारी मंडळ 30 जुलै रोजी मंगळवारी एक दिवसाचे लाक्षणिक आंदोलन करणार आहे.
तुळजाभवानी मंदिर व परिसर विकासासाठी मंदीर संस्थाने विकास आराखडा प्रसिद्ध केला असुन, तो अंतीम करण्यापुर्वी त्यावर सुचना व हरकती मागवल्या आहेत. तुळजापूर मंदीर व शहराच्या पूर्वेस विकास व्हावा अशी पुजारी मंडळाची मागणी आहे, याबाबत अनेक वेळा निवेदन दिली मात्र या मागणीचा विचार न केल्याने त्यास विरोध म्हणून पुजारी मंडळाने मंदीर संस्थान कार्यालयासमोर आंदोलनाचा निर्णय घेतला आहे अशी माहिती अध्यक्ष विपीन शिंदे यांनी दिली आहे.