धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे 30 जुलै रोजी मंगळवारी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असुन ते परंडा येथे जनता दरबार घेणार आहे. परंडा येथे होणाऱ्या जनता दरबारात ते नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या तिथेच सोडवणार आहेत. पालकमंत्री डॉ सावंत यांच्या जनता दरबाराची तयारी अंतीम टप्प्यात आली असुन जिल्ह्यातील सर्व विभागाच्या प्रमुखांना, अधिकारी यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
63 वरिष्ठ अधिकारी हे या जनता दरबाराला हजर राहणार आहेत यात महसूल, पोलिस, महावितरण, कृषी, आरोग्य, भुमी अभिलेख, पंचायत, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन, महिला बालविकास, क्रीडा, युवक कल्याण, पाणी पुरवठा, वन विभागासह इतरांचा समावेश असणार आहे. सर्व विभागाच्या समस्यासाठी विविध कक्ष तयार करण्यात आले असुन त्यासाठी कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या जनता दरबारात येताना नागरिकांनी त्यांच्या समस्या, त्याचे स्वरूप व समस्याबाबतची कागदपत्रे घेऊ यावीत असे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनी केला आहे.