धाराशिव –
आरटीई अंतर्गत खाजगी शाळांमधील प्रवेशाच्या मुद्यावरून शिवसेना आक्रमक झाली असुन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचे पोस्टर उलटे टांगत धाराशिव येथे आंदोलन करण्यात आले. राज्य सरकार व शिक्षण मंत्र्यांचे करायचं काय खाली मुंडकं वर पाय अश्या घोषणा करीत आंदोलन करण्यात आले.
राज्य सरकारने खाजगी शाळांमध्ये आरटीई प्रवेश प्रक्रिया अंतर्गत 25 टक्के राखीव जागा संदर्भात घेलेल्या निर्णयाला न्यायालयाने या स्थगिती दिली आहे मात्र राज्य सरकार अद्यापपर्यंत हा आदेश मागे घेत नाही त्यामुळे 25 टक्के राखीव जागेवरील प्रवेश प्रक्रिया रखडली असून याचा फटका सर्वसामान्य विद्यार्थ्यांना बसत आहे. या निर्णया विरोधात ठाकरे शिवसैनिक आक्रमक झाले असून धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे पोस्टर उलटे टांगत राज्य सरकारचे खाली मुंडके वर पाय अशी घोषणाबाजी करण्यात आले.