धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभासाठी सकाळी 7 ते दुपारी 6 या वेळेत 63.88 % मतदान झाले असल्याची अंतीम आकडेवारी समोर आली आहे. 19 लाख 92 हजार 737 मतदार पैकी 12 लाख 72 हजार 969 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्यात 6 लाख 90 हजार 533 पुरुष मतदार व 5 लाख 82 हजार 416 व 20 तृतीयपंथी मतदार यांनी मतदान केले. पुरुष मतदार टक्केवारी 65.53 तर महिला मतदार टक्केवारी 61.91 इतकी राहिली. तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक 2 लाख 45 हजार 627 मतदान झाले त्यापाठोपाठ धाराशिव लोकसभा मतदार संघात 2 लाख 34 हजार 106 मतदान झाले त्यामुळे या 2 मतदार संघाचा कौल महत्वाचा ठरणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत 68 हजार 137 इतके मतदान जास्त झाले त्यामुळे तेही महत्वाचे ठरणार आहे.
2019 च्या निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे यांना 49.5 तर राणा यांना 38.9 टक्के मते मिळाली.
2024 लोकसभा निवडणुकीत औसा 64.44 %, उमरगा 60.30 %, तुळजापूर 65.40 %, धाराशिव 63.93 %, परंडा 63.53 %, बार्शी 65.29 % मतदान झाले.
औसा विधानसभा मतदार संघात 2 लाख 94 हजार 086 पैकी 1 लाख 89 हजार 515 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. उमरगा विधानसभा मतदार संघात 3 लाख 10 हजार 703 पैकी 1 लाख 87 हजार 351 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तुळजापूर विधानसभा मतदार संघात 3 लाख 75 हजार 562 पैकी 2 लाख 45 हजार 627 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 3 लाख 65 हजार 951 पैकी 2 लाख 34 हजार 106 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. परंडा विधानसभा मतदार संघात 3 लाख 25 हजार 165 पैकी 2 लाख 6 हजार 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. बार्शी विधानसभा मतदार संघात 3 लाख 21 हजार 270 पैकी 2 लाख 9 हजार 754 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
धाराशिव लोकसभा मतदान आकडेवारी
2009 = 57.5 %
2014 = 64.75%
2019 = 63.87 %
2024 = 63.88 %