धाराशिव – समय सारथी
गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्या भगिनी तथा धाराशिव शहराच्या नगराध्यक्षा पुष्पाताई चंद्रहास पाटोदेकर यांचे दुःखद निधन झाले असुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार सायंकाळी 7 वाजता कपिलधार स्मशानभूमीत होणार आहे.
धाराशिव शहराच्या नगराध्यक्षा, भारत स्कॉउट आणि गाईडच्या अध्यक्षा, महिला मंडळ यासह विविध सामजिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी धाराशिव जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम केले.
पाटील कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ सदस्य या नात्याने त्यांनी कायम आम्हाला योग्य दिशा दाखवण्याचे काम केलं आहे. प्रेमळ व्यक्तिमत्वाचे निधन अत्यंत वेदनादायी आहे.. त्यांना सद्गती लाभो हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना अशी भावना आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केली.